मुलीचा पाठलाग करताना भाजप नेत्याचा मुलगा सीसीटीव्हीत कैद

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

हरियाना भाजपचे प्रमुख सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला व त्याच्या अन्य एका साथीदाराने पाठलाग करुन तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार या मुलीने दाखल केली आहे. या दोघांना अटक करण्यात आली आणि त्यांची जामीनावर सुटकाही करण्यात आली आहे.

चंदिगड : चंदिगडमध्ये आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीचा पाठलाग करणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाचे सीसीटीव्ही फुटेज अखेर पोलिसांच्या हाती लागले आहे.

हरियाना भाजपचे प्रमुख सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला व त्याच्या अन्य एका साथीदाराने पाठलाग करुन तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार या मुलीने दाखल केली आहे. या दोघांना अटक करण्यात आली आणि त्यांची जामीनावर सुटकाही करण्यात आली आहे. मात्र, पाठलाग करण्यात आलेल्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याने शंका उपस्थित करण्यात येत होत्या. 

अखेर हरियाना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये तो त्या मुलीचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त होण्याची मागणी करण्यात येत आहे. हरियानात बेटी बचाओचा नारा देण्यात येत असताना भाजप नेत्याच्या मुलावर आरोप झाल्याने खळबळ उडाली होती. या मुलीने फेसबुकवर पोस्ट लिहिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. चंदिगडच्या रस्त्यावर माझे अपहरणच झाले होते, असे शीर्षक देऊन तिने या प्रकरणाची सर्व माहिती लिहिली आहे. तिचे वडील अतिरिक्त मुख्य सचिव असून, त्यांनीही तिला पाठींबा दिला आहे. तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की अशा प्रकरणात दोषींना जोपर्यंत शासन होत नाही, तोपर्यंत अधिकाधिक मुलींना अशा घटनांना सामोरे जावे लागेल. माझ्यासारख्या सर्व मुली सुदैवी नसतात. या प्रकरणात मोठा लढा उभारावा लागणार आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Chandigarh stalking case: Police get video clips from 5 CCTV cameras