संसद मोर्चाला सुरुवात! बॅरिकेड्सना वेल्डिंग, लाठीचार्ज ते सरकारकडून चर्चेची तयारी; जंतर मंतरवर आतापर्यंत काय घडलं?

Jantar Mantar to Parliament CJP Protest: नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीकडून आंदोलन सुरू आहे. आता अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात झाली आहे.
Sansad Chalo Morcha

NEET Protest Reaches Parliament Amid Heavy Security

Esakal

Updated on

Sansad Chalo Morcha: दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे दिल्लीसह देशातलं वातावरण आता तापलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीकडून करण्यात येतेय. दोन दिवसांपूर्वी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून उचलून नेत दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. यानंतर सीजेपीकडून संसद मोर्चाची घोषणा करण्यात आली होती. आज संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असतानाच सीजेपीकडून संसद मोर्चासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसंच आता संसद मार्गावर भलोमोठे बॅरिकेड्स उभा करण्यात आले असून ते वेल्डिंग करून भक्कम केले आहेत. सीजेपीने यानंतर आरोप केला की सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. Barricades Welded as Parliament March Gets Underway

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com