गोव्यात 'बीफ' कमी पडू देणार नाही: मनोहर पर्रीकर

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

कर्नाटकमधून बीफची आयात सुरुच राहणार आहे. कारण राज्यातील नागरिकांना बीफ कमी पडू नये. इतर राज्यांतूनही मांस आयात करण्यात येईल. गोव्यात एकमेव कत्तलखाना असून, त्याठिकाणी दररोज 2 हजार किलो मांस मिळते. राज्यात मांसाचे संकट निर्माण होऊ नये, म्हणून शेजारील राज्यांतून जनावरांची खरेदी करण्यात येईल.

पणजी : भाजपकडून एकीकडे बीफ आणि गोमांसावर बंदी घातली जात असताना गोव्यात मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेला विश्वास देत जनावरांचे मांस (बीफ) कमी पडू देणार नसल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने आणि भाजपशासित राज्यांत जनावरांच्या मांसाबाबत नियम कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे गोरक्षकांकडून गोमांस बाळगल्याबद्दल मारहाण केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. आता भाजपचेच गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मांस कमी पडले तर इतर राज्यांतून आणले जाईल, पण कमी पडू देणार नाही असे आश्वासन विधानसभेत राज्यातील नागरिकांना दिले. 

भाजप आमदाराच्या एका प्रश्नावर उत्तर देताना पर्रीकर म्हणाले, की कर्नाटकमधून मांसाची आयात सुरुच राहणार आहे. कारण राज्यातील नागरिकांना मांस कमी पडू नये. इतर राज्यांतूनही मांस आयात करण्यात येईल. गोव्यात एकमेव कत्तलखाना असून, त्याठिकाणी दररोज 2 हजार किलो मांस मिळते. राज्यात मांसाचे संकट निर्माण होऊ नये, म्हणून शेजारील राज्यांतून जनावरांची खरेदी करण्यात येईल. बाहेरील राज्यांतून येणाऱ्या मांसाची तपासणी करण्यात येईल.

मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील जनतेला मांसाबद्दल दिलेले आश्वासन पाहून आश्चर्यचकीत झालो असल्याचे काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: CM Manohar Parrikar says Goa will not restrict beef imports from Karnataka to avoid a shortage