Mamata Banerjee News : ममता बॅनर्जींना मोठा धक्का; 'या' महत्वाच्या निवडणुकीत काँग्रेसनं केला दारुण पराभव

Mamata Banerjee News: एचडीआयएससीच्या निवडणुका दर दोन वर्षांनी होत असतात.
Mamata Banerjee News
Mamata Banerjee Newsesakal
Summary

गेल्या HDISC निवडणुकीत टीएमसीनं सर्व जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी उलटेच निकाल लागले.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील 'तृणमूल'ला (Trinamool Congress) काँग्रेसच्या हातून धक्के बसत आहेत.

नुकत्याच झालेल्या आणखी एका महत्त्वाच्या निवडणुकीत काँग्रेसनं डाव्यांसह टीएमसीचा धुव्वा उडवला. यापूर्वी दोन्ही पक्षांनी मिळून सागरदिघी विधानसभा पोटनिवडणुकीत (Sagardighi Assembly By-Election) टीएमसीचा पराभव केला होता.

काँग्रेस आणि डाव्यांच्या युतीनं पूर्व मिदनापूरमधील हल्दिया डॉक इन्स्टिट्यूट स्टीयरिंग कमिटीमध्ये (HDISC) टीएमसी शून्यावर आणली आहे. युतीच्या उमेदवारांनी निवडणुकीत सर्व 19 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि टीएमसीचं खातं उघडू शकलं नाही. एचडीआयएससीच्या निवडणुका दर दोन वर्षांनी होत असतात.

Mamata Banerjee News
Atique Ahmed : कुटुंबीयांच्या डोळ्यात भीती; अतिकची बहीण म्हणाली, 'भावाचा होऊ शकतो एन्काउंटर'

तृणमूल, ममता बॅनर्जींना धक्का?

विशेष म्हणजे, गेल्या HDISC निवडणुकीत टीएमसीनं सर्व जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी उलटेच निकाल लागले. पक्षानं येथील सर्व 19 जागांवर उमेदवार उभे केले. माकपचे जिल्हाध्यक्ष निरंजन सिंघी म्हणाले, 'गेल्या निवडणुकीत आमच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. यावेळी मतदारांनी काँग्रेससोबतच्या आमच्या आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय.'

Mamata Banerjee News
Atiq Ahmed ला घेऊन जाणाऱ्या व्हॅनच्या धडकेत गाय ठार; मिशीला पीळ मारत अतिक म्हणाला, मी घाबरत नाही..

पोटनिवडणुकीत CM बॅनर्जींच्या नातेवाईकाचा पराभव

मार्चमध्ये जाहीर झालेल्या सागरदिघी पोटनिवडणुकीच्या निकालांनी टीएमसीसाठी वाईट बातमी आणली होती. पक्षाचे उमेदवार आणि सीएम बॅनर्जी यांचे दूरचे नातेवाईक असलेल्या देबाशिष बॅनर्जी यांचा काँग्रेस उमेदवार बॅरन विश्वास यांनी सुमारे 23,000 मतांनी पराभव केला. यासह पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेसचं खातं उघडलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com