काँग्रेसची नजर ओवैसींच्या बालेकिल्लावर; राहुल गांधी करणार हैदराबादचा दौरा

Congress eye on Owaisis stronghold
Congress eye on Owaisis strongholdCongress eye on Owaisis stronghold

पाच राज्यांतील दारुण पराभवानंतर काँग्रेसने २०२३च्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यावेळी काँग्रेसची नजर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबाद जिंकण्यावर आहे. त्यासाठी काँग्रेस पक्ष अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे ४ एप्रिलला तेलंगणामध्ये पोहोचणार आहेत. (Congress eye on Owaisis stronghold)

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपची बी-टीम म्हणून काम केले, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. अशा स्थितीत आता त्यांची नजर ओवैसींच्या (Asaduddin Owaisi) बालेकिल्ल्या हैदराबादकडे आहे. या भागात तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी, खासदार उत्तम कुमार रेड्डी, कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी आणि इतर नेते ४ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. तेलंगणाचे AICC प्रभारी मणिकम टागोर हे देखील बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Congress eye on Owaisis stronghold
ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

काँग्रेस (Congress) सदस्यत्व मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहे. नवीन सदस्यांच्या नामांकनात पक्षाच्या तेलंगणा युनिट इतर दक्षिणेकडील राज्यांपेक्षा पुढे आहे. तेलंगणामध्ये सुमारे ४० लाख, कर्नाटकात ३४ लाख, महाराष्ट्रात १५ लाख, गुजरातमध्ये १० लाख, केरळमध्ये १० लाख, छत्तीसगडमध्ये पाच लाख, बिहारमध्ये चार लाख, दिल्ली आणि राजस्थानमध्ये तीन लाख सदस्य पक्षात सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तेलंगणा विधानसभेसाठी निवडणुका

काँग्रेस (Congress) सदस्यत्व मोहीम १ नोव्हेंबरपासून सुरू झाली. निवडणूक आव्हानांसाठी पक्षाला चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी डिजिटल सदस्यत्वावर भर देण्यात आला आहे. ही मोहीम ३१ मार्चला पूर्ण होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत सुमारे साडेचार कोटी लोक काँग्रेसचे सदस्य झाले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, तेलंगणातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी डिसेंबर २०२३ मध्ये किंवा त्यापूर्वी निवडणुका होणार आहेत.

Congress eye on Owaisis stronghold
पंतप्रधानांना काँग्रेसचा टोमणा; म्हणाले, महागाईच्या बाबतीत मोदी धर्मनिरपेक्ष

ही दुसरी भेट असेल

अलीकडच्या काही दिवसांत काँग्रेस तेलंगणातील नेते आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यातील ही दुसरी भेट राहणार आहे. राहुल यांनी बुधवारी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी राज्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com