कोरोनामुळे गर्भपातात झाली २० टक्के वाढ; तज्ज्ञांचा खुलासा

Corona causes 20 percent increase in
Corona causes 20 percent increase inCorona causes 20 percent increase in

कोरोनाचा प्रभाव अद्याप संपलेला नाही. संक्रमित व्यक्तीच्या शरीरात कोरोना रूप बदलून जिवंत आहे. कोरोनाने पुरुषांच्या शुक्राणूवर प्रभाव पाडला आहे. तसेच महिलांमध्ये गर्भपात होण्याचे हे एक प्रमुख कारणही ठरत आहे. कोरोनामुळे सुमारे २० टक्के महिलांमध्ये गर्भपाताची (abortion) प्रकरणे वाढली आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ गायनॅकॉलॉजिकल एंडोस्कोपिस्टच्या बैठकीत तज्ज्ञांनी संशोधनाचा हवाला देत हा खुलासा केला आहे. (Corona causes 20 percent increase in abortion)

लखनऊमध्ये आलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, कोरोनाने पुरुषांच्या फुफ्फुसांसह शुक्राणू आणि इतर अवयवांवर हल्ला केला आहे. केरळचे डॉ. सुभाष मल्ल्या यांनी सांगितले की, शुक्राणूवर कोरोनाच्या परिणामावर ब्राझील आणि अमेरिकेत दोन संशोधने पूर्ण झाले आहेत. शुक्राणूवर हल्ला केल्याने गर्भात कोणत्या स्तरावर मानसिक विकार निर्माण होऊ शकतात हे शोधण्यासाठीही संशोधन केले जात आहे.

Corona causes 20 percent increase in
ठग सुकेश चंद्रशेखरचे उपोषण; पत्नीसोबत राहू देण्याची करतोय मागणी

कोरोनाने (Corona) पुरुषांच्या शुक्राणूच्या डीएनए तुटल्यामुळे गर्भ विकसित होत नाही. त्यामुळे गर्भपाताची प्रकरणे समोर येत आहेत, असे संशोधनातून समोर आले आहे. मागील महिन्याच्या तुलनेत गर्भपाताच्या (abortion) प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आता संक्रमित प्रकरणांवर विशेष लक्ष दिले जात आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

एखादी महिला तुटलेल्या शुक्राणूने गर्भवती झाली तर मुलामध्ये विकृती होण्याची भीती असते. मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही विकृती होऊ शकते, असे मेरठचे तज्ज्ञ डॉक्टर सुनील जिंदाल यांनी सांगितले. कोरोना निगेटिव्ह आल्यानंतरही हा विषाणू आपल्या शरीरात राहतो. आपल्या शरीरात कोरोनाचे स्वरूप बदलते. यामुळे वेळोवेळी पोट, किडणी, फुप्फुस, न्यूमोनिया सारखे आजार होतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Corona causes 20 percent increase in
महाराष्ट्रातील आमदारांना संभाजीराजेंचे खुलं पत्र; म्हणाले...

ते अँटीबॉडीज बूस्टर डोसपेक्षा चांगले

जगभरात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असले तरी भारतात संसर्ग झालेले लोक किरकोळ त्रासानंतर बरे होत आहेत. कोरोनाची (Corona) लस घेतलेल्या लोकांना ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर तयार होणारे अँटीबॉडीज बूस्टर डोसपेक्षा चांगले असल्याचा दावा नवीन अभ्यासातून करण्यात आला आहे. हे सर्व प्रकारच्या रूपांशी लढण्यास सक्षम आहे. वॉशिंग्टन विद्यापीठ आणि बायोटेक एसई यांनी संयुक्तपणे हा अभ्यास केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com