सावधान! 'द काश्मीर फाईल्स' बद्दल तुम्हाला लिंक आलीय का? पोलिसांनी दिला इशारा

पोलिसांनी लोकांना 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाशी संबंधित कोणतीही लिंक सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यास क्लिक न करण्याचे आवाहन केले
The Kashmir Files Movie WhatsApp Scam
The Kashmir Files Movie WhatsApp Scamसकाळ डिजिटल टीम

विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' सध्या बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटासंबंधीत बरीच चर्चा सुरु आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या उत्सुकता पाहता याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. 'द काश्मीर फाइल्स'च्या मोफत डाउनलोड लिंक पाठवून फसवणूक (Cyber Crime) केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. नोएडा पोलिसांनी याबाबत माहिती देत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (‘The Kashmir Files’ WhatsApp scam)

पोलिसांनी लोकांना 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाशी संबंधित कोणतीही लिंक सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यास क्लिक न करण्याचे आवाहन केले. हा एक प्रकारचा स्कॅम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोफत चित्रपट असल्याचे आमिष दाखवून लोकांना लिंक पाठवली जाते. अशा अमिषाला बळी पडत लोक त्या लिंकवर क्लिक करतात. त्यानंतर हे सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांचे फोन हॅक करून त्यांची बँक खाती रिकामे करतात.

The Kashmir Files Movie WhatsApp Scam
Video: मुस्लिम नेत्यांकडून आज कर्नाटक बंदची हाक

नोएडाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त रणविजय सिंह यांनी सांगितले की गेल्या २४ तासात जवळपास ३० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी एका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर युजरचे डिव्हाइस रिमोट लोकेशनवरून हॅक केले जाते व त्यांची बँक खाती रिकामी केले जाते. हा प्रकार व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com