R. K. Laxman : व्यंगचित्रांमध्ये एकमेकांचे स्पर्धक असणारे आर के लक्ष्मण अन् बाळासाहेब खऱ्या आयुष्यात होते चांगले मित्र

तुम्हाला माहिती आहे का आर के लक्ष्मण यांचे बाळासाहेबांसोबत एक अनोखे नाते होते.
R. K. Laxman Death anniversary
R. K. Laxman Death anniversarysakal

R. K. Laxman Death Anniversary : जेव्हा जेव्हा व्यंग-चित्रकार विषयी बोललं जातं तेव्हा प्रत्येकवेळी एक नाव समोर येतं, ते म्हणजे आर के लक्ष्मण याचं. द कॉमन मॅन म्हणून ओळखले जाणारे आर के लक्ष्मण यांच्या कार्टूनचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच चाहते तुम्हाला मिळणार. आज त्यांची पुण्यतिथी आहे. २६ जानेवारी २०१५ मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Death anniversary R. K. Laxman and balasaheb thackeray relation friendship read story)

आर के लक्ष्मण यांनी त्यांचं संपुर्ण आयुष्य व्यंगचित्रासाठी वेचलं. त्यांच्या वेळी देशात अनेक व्यंगचित्रकारही होते. बाळासाहेब ठाकरे ही त्यांचे स्पर्धक राहले पण तुम्हाला माहिती आहे का आर के लक्ष्मण यांचे बाळासाहेबांसोबत एक अनोखे नाते होते. आज आपण त्यांच्यासंदर्भातच जाणून घेणार आहोत.

R. K. Laxman Death anniversary
Balasaheb Thackeray: "बाळासाहेबांचं आम्हाला वेड होतं"; ठाकरेंच्या आठवणीत रमले नारायण राणे

आर के लक्ष्मण अन् बाळासाहेब यांची मैत्री

आर के लक्ष्मण आणि बाळासाहेब हे समकालीन व्यंगचित्रकार होते. त्यामुळे ते एकमेकांचे चांगले स्पर्धकही होते पण फार कमी लोकांना माहित असावं की ते एक उत्तम मित्र सुद्धा होते. त्यांच्यामध्ये मैत्रीचं अतूट नातं होतं जे त्यांनी अखेरपर्यंत जपलं.

आर के लक्ष्मण यांच्या आजारपणातही बाळासाहेबांनी पुण्याला जाऊन त्यांची वारंवार भेट घेत असे.

R. K. Laxman Death anniversary
Balasaheb Thackeray: "बाळासाहेबांचं आम्हाला वेड होतं"; ठाकरेंच्या आठवणीत रमले नारायण राणे

आर के लक्ष्मण आणि बाळासाहेब यांनी एकाच वेळी ‘फ्री प्रेस’ दैनिकातून व्यंगचित्राच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

नंतर समोर बाळासाहेब राजकारणात उतरले तर आर के लक्ष्मण यांनी पत्रकारीतेत आपलं नशीब उजळवलं पण तेव्हापासून त्यांच्यात घट्ट मैत्री होती. सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे नाते होते आणि हे नाते त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपले.

R. K. Laxman Death anniversary
Balasaheb Thackeray Jayanti: प्रतिमापूजनावरून ठाकरे, शिंदे गटात धुसफूस

आर. के लक्ष्मण यांनी नेहमी सामान्य माणसाचे प्रश्न आपल्या व्यंगचित्रातून मांडले. शिक्षण, राजकीय, कृषी, आरोग्य व्यवस्था, अध्यात्म, विज्ञान, सांस्कृतिक, गरीबी अशा विविध विषयांवर व्यंगचित्रे काढली. त्यांची व्यंगचित्र आजही अजरामर आहे.

आर. के. लक्ष्मण हे एक अजरामर युग आहे आणि त्या युगाची आठवण प्रत्येकाला असावी यासाठी पुणे येथे केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने बालेवाडी येथे आर. के. लक्ष्मण संग्रहालयाचे संकेतस्थळ साकारण्यात आलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com