Hate Speech : फेसबुककडून भारतातील 1 कोटीहून अधिक कंटेट पीसवर कारवाई

आयटी नियमांतर्गत फेसबुक इंडियाच्या मासिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
facebook
facebook sakal

नवी दिल्ली : भारतातील अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया साइट फेसबुकला भारतातून (Facebook India) मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर फेसबुक मेटाकडून भारतातील एक कोटीहून अधिक कंटेट पीसवर (Content Violation) कारावाई केल्याचे स्पष्ट केले आहे. जानेवारी महिन्यात यावर कारवाई करण्यात आल्याचे मेटाने म्हटले आहे. आयटी नियमांतर्गत फेसबुक इंडियाच्या मासिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.(Face Book India Taken Action On Hate Speech Content)

facebook
Photos : युक्रेनच्या लढवय्याने युरोपियन संसदेतही जिंकली मनं

याबाबत मेटाने (Meta) एका निवेदनात म्हटले आहे की, 11.6 दशलक्ष कंटेट पोस्टवर कारवाई केली असल्याचे म्हटले आहे. ज्यांनी फेसबुकच्या नियमांचे आणि कायद्यांमधील 13 श्रेणींचे उल्लंघन केले त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे मेटाने निवेदनात स्पष्ट केले आहे. यामध्ये द्वेषयुक्त भाषण (Hate Speech), गुंडगिरी, अश्लीलता आणि लैंगिक विषयांशी संबंधित तक्रारींचा समावेश असून, द्वेषयुक्त भाषण, आत्महत्या, आत्मघाती कृत्य, स्पॅम आणि हिंसक मजकूराविरोधातदेखील पावले उचलली गेल्याचे मेटाने म्हटले आहे.

facebook
...तर FM चॅनल्सवर कडक कारवाई होणार, केंद्राकडून निर्देश जारी

फेसबुकने म्हटले आहे की, 1 ते 31 जानेवारी दरम्यान फेसबुकने 11.6 कोटींहून अधिक कंटेटवर कारवाई केली आहे. तर इंस्टाग्रामने या कालावधीत 32 लाखांहून अधिक कंटेटवर कारवाईचे पाऊले उचलली असून, यापूर्वीदेखील सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर द्वेषयुक्त भाषण, खोट्या बातम्या, चुकीची माहिती यासारख्या तक्रारींसाठी टीका केली जाते. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जबाबदार बनवण्याची सरकार आणि इतर मंचांकडून सातत्याने मागणी होत आहे. फेसबुककडून काढून टाकण्यात आलेल्या कंटेटमध्ये 65 लाख स्पॅम, 18 लाख कंटेट हिंसेशी संबंधित, 14 लाख अश्लीलतेसंबंधी तर, 28,600 हून अधिक द्वेषयुक्त भाषण संबंधित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com