
पाकिस्तानमध्ये बेनझिर भुट्टो यांच्या काळात खासदार असणारा नेता भारतात आज आइसक्रीम विकतोय असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण गेल्या २५ वर्षांपासून या नेत्याचं कुटुंब भारतात राहत आहे. आजही या नेत्याच्या पूर्वजांची जवळपास २५ एकर जमीन पाकिस्तानात आहे. सध्या भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात राहणारा पाकिस्तानचा माजी खासदार चर्चेत आलाय. बेनझिर भुट्टो या पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान होत्या. दोन वेळा त्यांनी पंतप्रधान पद भूषवलं होतं. २००७ मध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या सरकारमध्ये डबाया राम हे खासदार होते.