जिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार

Government Allows Co-Operative Banks To Deposit Old Notes With RBI
Government Allows Co-Operative Banks To Deposit Old Notes With RBI
Updated on

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर अडचणीत सापडलेल्या जिल्हा सहकारी बँकांना केंद्र सरकारने दिलासा देत नोटाबंदीनंतर या बँकांमध्ये जमा झालेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) जमा करण्याची परवानगी दिली आहे. जमा झालेली रोकड आरबीआयकडे जमा करण्यासाठी तसेच चलनबदल करण्यासाठी जिल्हा बँकांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांच्या कालावधीत जिल्हा बँकांना स्वतःकडे जमा झालेल्या पाचशे व हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करता येतील, असे निर्देश अर्थ मंत्रालयाने दिले आहेत. याशिवाय, बँका आणि टपाल कार्यालयानांदेखील 30 डिसेंबर, 2016 पूर्वी जमा झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून बदलून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आधी या नोटा का जमा झाल्या नाहीत याचे स्पष्टीकरणदेखील मागितले जाणार आहे.

जिल्हा बँकांकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी रोकड नसल्याची बाब समोर आल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी 14 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून जिल्हा सहकारी बॅंकांना रोकड स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास बंदी घातली होती. जिल्हा सहकारी बॅंकांना परवानगी दिल्यास त्या काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली होती. त्यानंतर, महाराष्ट्रात शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी राज्यातील जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या 2,270 कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून बदलून मिळाव्यात ही मागणी उचलून धरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com