हॉटेल, विमानतळांवर आता हुक्‍क्‍यावर बंदी

पीटीआय
शनिवार, 27 मे 2017

स्मोकिंग झोनमध्ये धूम्रपानाव्यतिरिक्त अन्य कोणतीही सेवा देता येणार नाही, असा नियम आहे.

नवी दिल्ली : हॉटेल, रेस्टॉरंट आणि विमानतळावरील स्मोकिंग झोनमध्ये हुक्‍क्‍यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासाठी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याच्या नियमात दुरुस्ती केली आहे.

स्मोकिंग झोनमध्ये धूम्रपानाव्यतिरिक्त अन्य कोणतीही सेवा देता येणार नाही, असा नियम आहे. या नियमाचे उल्लंघन करीत अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट ग्राहकांना हुक्का पुरवत होते. यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

तसेच, हॉटेल, रेस्टॉरंट आणि विमानतळांवर स्मोकिंग झोनच्या बाहेर धूम्रपान ते करणारे आणि न करणाऱ्या दोन्हींसाठी आरोग्यास हानिकारक असल्याचा 60x 30 फूट आकाराचा फलक आता लावावा लागणार आहे. तसेच, स्मोकिंग झोनमध्ये अठरा वर्षांखालील व्यक्तींना प्रवेश नसेल, असाही उल्लेख करावा लागेल. याबाबतची अधिसूचना 23 मे रोजी काढण्यात आली आहे.

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा : 

आणखी ताज्या बातम्या वाचा:

Web Title: hukka ban at hotels, airports, addiction, drugs