अमेरिकेत वादळामुळे भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यु

पीटीआय
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

वादळाच्या फटक्‍यामुळे तलावात पोहताना निखिल व शालिनी तलावाच्या अधिक खोल भागात ढकलले गेले. या दोघांनाही अत्यंत गंभीर अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले

ह्युस्टन - हार्वे या वादळाचा फटका बसलेल्या अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात निखिल भाटिया या 24 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचाही मृत्यु झाल्याचे आढळून आले आहे.

येथील टेक्‍सास ए अँड एम विद्यापीठामध्ये शिकत असलेला निखिल गेल्या शनिवारी शालिनी सिंग या त्याच्या मैत्रिणीसमवेत "लेक ब्रायन' येथे पोहण्यासाठी गेला होता. मात्र वादळाच्या फटक्‍यामुळे तलावात पोहताना निखिल व शालिनी तलावाच्या अधिक खोल भागात ढकलले गेले. या दोघांनाही अत्यंत गंभीर अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राणांतिक जखमा झाल्याने निखिल याचे निधन झाले आहे; तर शालिनीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: Hurricane Harvey: Indian student dies in US