कोरोना विषाणूचा फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानी

India stands on 10th position in COVID-19 cases worldwide
India stands on 10th position in COVID-19 cases worldwide

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना आता तो भारतातही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता क्रमवारीत पहिल्या दहा देशांमध्ये पोहचला आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, यु के, स्पेन,  इटली, फ्रान्स, जर्मनी आणि टर्की यांच्यानंतर भारत दहाव्या स्थानी पोहचला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात सर्व देशांनाच वेठीस धरले आहे. त्यामुळे सर्वच देश आपापल्या परीने या संकटावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र अद्याप पर्यंत यामध्ये यश मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जगातील अन्य देशांसोबत भारतात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्य स्थितीत भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे बाधित असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन त्याची संख्या इराण पेक्षा अधिक झालेली आहे. देशात मागील २४ तासात ६ हजार ७३७ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, १४७ जणांचा मृत्यू झालेला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून चीनमधील वुहान शहरापासून सुरु झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात थांबण्याचे नाव घेत नसून, कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील चित्र देखील यापासून वेगळे नसून, आरोग्य मंत्रालयाने आज प्रसिद्ध केलेल्या माहिती नुसार देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून ती १ लाख ३८ हजार ८४५ इतकी झालेली आहे. इराण मध्ये १ लाख ३५ हजार ७०१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतानंतर आता इराण ११ व्या स्थानी आहे. भारतात ४ हजार २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारताने कोरोना विषाणूचा फटका बसलेल्या देशांच्या यादीत इराणला मागे टाकले असून, देशात सध्या ७७ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ५७ हजार ७२१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
--------
वडिलांना सायकलवरून घेऊन जाणाऱ्या ज्योतीने फेटाळला क्रीडामंत्र्यांचा प्रस्ताव
--------
भारतीय शास्त्रज्ञांची कमाल; तयार केला विषाणू नष्ट करणार मास्क; एवढी आहे किंमत
--------
कोरोनाची जगातली परिस्थिती : जाणून घ्या एका क्लिकवर
--------
पुण्यावरून 'या' आठ शहरांसाठी सुरु झाली विमानसेवा; लोहगाववरून टेक ऑफ
-------
देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रातून विशेषतः मुंबईतून वाढल्याचे समोर येत आहे. एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३० हजारांच्या देखील पुढे गेली असून, संपूर्ण राज्यात ती ५० हजारांवर पोहचली आहे. तर संपूर्ण जगभरात जगभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळ जवळ ५४ लाखांच्याही पुढे पोहचली असून, या विषाणूच्या संसर्गाने ३ लाख ४५ हजार ६४ जणांचा जीव घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com