Digital Payment: डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा डंका, चीनसह 'या' देशांना टाकले मागे

UPI च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांच्या बाबतीत भारत संपूर्ण जगात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
UPI Payment
UPI Payment sakal

Digital Payment: UPI च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांच्या बाबतीत भारत संपूर्ण जगात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. 2022 च्या आकडेवारीनुसार 2021 च्या तुलनेत भारत आघाडीवर आहे. देशातील डिजिटल पेमेंटमध्ये 91 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

डिजिटल पेमेंटच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. भारतातील डिजिटल व्यवहार 89.5 दशलक्ष झाले आहेत. भारतानंतर ब्राझील 29.2 दशलक्ष, चीन 17.6 दशलक्ष, थायलंड 16.5 दशलक्ष आणि दक्षिण कोरिया 8 दशलक्ष आहेत.

डिजिटल पेमेंटच्या बाबतीत हे देश एकेकाळी भारतापेक्षा पुढे होते. आता या चार देशांचे आकडे एकत्र केले तरी भारत खूप पुढे आहे. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत चीन एकेकाळी नंबर वन होता.

UPI Payment
Entrepreneurs: IAS आणि IPS पदाच्या नोकरीला मारली लाथ; आज आहेत उद्योग जगतातील बादशहा

2010 मध्ये चीनचे डिजिटल पेमेंटची संख्या सर्व देशांपेक्षा जास्त होती. त्यावेळी चीनचा डिजिटल व्यवहार 1119 दशलक्ष होता. भारत दुसऱ्या क्रमांकावर होता, ज्याचा 370 दशलक्ष व्यवहार होता. अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर होता, ज्याचे डिजिटल व्यवहार 153 दशलक्ष होते.

भारतात डिजिटल पेमेंट वेगाने वाढत आहे. 2010 पासून भारतात डिजिटल पेमेंटला वेग आला आहे. 2014 नंतर त्यात बरीच वाढ झाली आहे.

2023 मध्ये भारताचा डिजिटल पेमेंट आलेख वेगाने वाढत आहे. तर दुसरीकडे डिजिटल पेमेंटच्या बाबतीत चीनचा आलेख घसरला आहे. भारताने यावेळी 89.5 दशलक्षचा टप्पा ओलांडला आहे.

या शहरांमध्ये डिजिटल पेमेंट सर्वात जास्त

2022 च्या आकडेवारीनुसार, भारतात सर्वाधिक डिजिटल पेमेंट बेंगळुरूमध्ये होत आहे. दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर डिजिटल पेमेंटच्या बाबतीत मुंबईचा नंबर आहे. बंगळुरूमध्ये 2022 मध्ये 6500 कोटी रुपयांचे 29 दशलक्ष व्यवहार झाले.

UPI Payment
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com