काश्मीरमध्ये जवानांची कारवाई; पाकचे दोन कमांडो ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मे 2017

श्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय जवानांनी पाकिस्तानी बॉर्डर ऍक्शन टीमच्या दोन कमांडोना आज (शुक्रवार) कंठस्नान घातले आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी कमांडो हल्ल्याच्या प्रयत्नात होते. नियंत्रण रेषेवर गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानी कमांडोंवर कारवाई केली. यामध्ये दोन्ही कमांडो ठार झाले. भारतीय लष्कराने त्यांचा घातपाताचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमच्या या कमांडोंनी 1 मे रोजी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला होता. भारतीय नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी थेट कारवाई करत अनेक बंकर उडवून दिले होते. भारतीय लष्कराने संबंधित व्हिडिओही प्रसिद्ध केला होता. पाकिस्तानने मात्र असे काही घडलेच नसल्याचे म्हटले होते. यानंतर पाकिस्तानी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्यामुळे पाकिस्ताननेही आपण भारतीय चौक्या कशा नष्ट केल्याचा बनावट व्हिडीओ जारी केला होता. परंतु, त्यांचा खोटारडेपणा समोर आला आहे.

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:
Web Title: indian Army kills 2 pakistani BAT attackers in Uri