उच्चशिक्षित महिलेकडून कराचीत आत्मस्फोट | Karachi suicide bomberhighly qualified | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide bomber

उच्चशिक्षित महिलेकडून कराचीत आत्मस्फोट

मुंबई : बलुचिस्तान येथील एका महिलेने मंगळवारी कराची येथे आत्मस्फोट (suicide bombing) घडवून आणला. स्फोट घडवणारी महिला उच्च शिक्षित असून तिचा पती डॉक्टर आहे आणि तिला दोन मुलेही आहेत. बलुचिस्तानच्या ३० वर्षीय शेरी बलोच हिने घडवलेल्या स्फोटात तीन चीनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: 'पाकपासून बलुचिस्तान स्वातंत्र्य झाल्यास पहिली मूर्ती मोदींची उभारू'

शेरीने केलेल्या आत्मस्फोटाची जबाबदारी अफगाणिस्तानातील Balochistan Liberation Army (BLA) या संघटनेने घेतली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरी हिने प्राणिशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असून तिचे एका डॉक्टरशी लग्न झाले आहे. ती MPhillचा अभ्यास करत होती व विज्ञान शिक्षिका म्हणूनही कार्यरत होती. शेरी विद्यार्थिदशेत असताना Baloch Students’ Organisationची सदस्या होती.

हेही वाचा: बलुचिस्तान स्फोटातील मृतांची संख्या 130 वर

BLAच्या Majeed Brigadeच्या विशेष आत्मत्याग दलात ती दोन वर्षांपूर्वी सामील झाली होती. तिला दोन मुले असल्याने या दलातून बाहेर पडण्याची संधी तिला देण्यात आली होती; मात्र ती ठाम राहिली. या संघटनेने आता आणखी चीनी नागरिकांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. संघटनेच्या प्रक्रियेनुसार शेरी पुनर्विचार करण्याची संधी देण्यात आली होती; मात्र तिने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आणि आत्मस्फोट घडवण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला.

हेही वाचा: 'मदरश्यांच्या माध्यमातून पाकिस्तान भारतातल्या दहशतवादाला प्रोत्साहन देतंय'

BLAचा प्रवक्ता जीयांद बलोच याने सांगितले की, "चीनच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय विस्ताराचे प्रतीक असणाऱ्या संस्थेवर हल्ला करून चीनला असा संदेश देण्यात आला आहे की, त्या देशाचे बलुचिस्तानमधील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अस्तित्त्व खपवून घेतले जाणार नाही. "

Web Title: Karachi Suicide Bomber Highly Qualified Mother Of A Two

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top