esakal | भारतातील टॉप 10 अब्जाधीश ते अमित शहांच्या जीवाला धोका; ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

today

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

भारतातील टॉप 10 अब्जाधीश ते अमित शहांच्या जीवाला धोका; ठळक बातम्या क्लिकवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कोरोनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु, परीक्षा ठरलेल्या दिवशीच होईल, असे आयोगाच्या सहसचिवांनी स्पष्ट केले आहे.  देशातील सरसकट नागरिकांना कोरोनाची लस देण्यात यावी. यात वयाचं मर्यादा असू नये अशी मागणी होतं आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. सरकारचं लक्ष्य सर्वांना लस देण्यापेक्षा ज्यांना त्यांची सर्वाधिक गरज आहे अशांना ती देण्याचं आहे, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं आहे.  सत्ता आणि व्यसन अशा वस्तू आहेत ज्या सुटता सुटत नाहीत. राजकारणी लोक सत्तेत राहण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करतात. कोणत्याही पद्धतीने सत्तेत राहणं हेच त्यांचं उदिष्ट असतं. याचीच प्रचिती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे पाहिल्यावर येते. पुतिन यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे २०३६ पर्यंत सत्तेत राहण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय. कोरोनासंबंधी नियम मोडल्यास थेट एखाद्या सोसायटीला दंड ठोठवण्यात येणार आहे. ५ पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत 'मिनी कंटेन्मेंट' म्हणून घोषित केली जाणार आहे. तसा फलक बाहेर लावणार येणार असून बाहेरच्या लोकांना सोसायटीत प्रवेश बंदी केली जाणार आहे. 


देशातील सर्वाधिक श्रीमत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. शिवाय देशातील अब्जाधीशांची संख्याही वाढली आहे. 2020 मध्ये अब्जाधीशांची संख्या 102 वरुन 140 पर्यंत वाढली.. वाचा सविस्तर- 

कोर्टाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर ठाकरे सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या वतीनं दोन याचिका दाखल झाल्या आहेत. वाचा सविस्तर-

मुंबईतील सीआरपीएफच्या मुख्यालयात एक ई-मेल आला असून यामध्ये शहा आणि योगी यांना येत्या काळात जीवे मारण्यात येईल असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर-

जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० या तीन वर्षांत ३२ जिल्हादंडाधिकाऱ्यांनी या कायद्यांतर्गत आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. वाचा सविस्तर-

कोरोनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु, परीक्षा ठरलेल्या दिवशीच होईल, असे आयोगाच्या सहसचिवांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर-

पुण्यातील बुधानी बटाटा वेफर्सचे मालक राजूशेठ चमनशेठ बुधानी यांचे मंगळवारी (दि.६) सकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. वाचा सविस्तर-

मुंबईत ३० एप्रिलपर्यंत दिवसा जमावबंदी, BMCने जाहीर केले नवी नियम. वाचा सविस्तर-

कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायिक आणि जनमानसात तीव्र नाराजी आहे. या सर्व घटकांशी पुन्हा नव्याने चर्चा करून अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून केली. वाचा सविस्तर-

 देशातील सरसकट नागरिकांना कोरोनाची लस देण्यात यावी. यात वयाचं मर्यादा असू नये अशी मागणी होतं आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. वाचा सविस्तर-

पुतिन यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे २०३६ पर्यंत सत्तेत राहण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय. वाचा सविस्तर-

 

loading image