वीज ग्राहकांना महावितरणचा झटका ते भारताचा ऑस्ट्रेलियाला धक्का; महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Aaj Divasbharat
Aaj Divasbharat

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार सहभागी होणार असून याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नवाब मलिक यांनी दिली आहे. संसदेत खासदारांना कँटिनमध्ये देण्यात येणारी सबसिडी आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील वाढीव वीजबील न भरलेल्या ग्राहकांना महावितरणने इशारा दिला असून थकबाकी न भरल्यास कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2-1 ने जिंकली आहे. अनेक खेळाडू जखमी असतानासुद्धा भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाने खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

INDvsAUS : 'मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर राहुल द्रविड!'
मंगळवारचा दिवस टीम इंडियासाठी मंगलदायी ठरला. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना भारताने जिंकत नवा इतिहास घडवला आहे. - सविस्तर वाचा

भारताला कधीच कमी समजू नका, पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कोच जस्टिन लँगरचा सल्ला
दुखापतींचा सामना करत असलेल्या अनुभवहीन टीम इंडियाकडून झालेल्या पराभवाचा ऑस्ट्रेलियन कोच जस्टिन लँगर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. - सविस्तर वाचा

रिषभ पंत : जो जिता वही सिकंदर!
'पंत काही सुधारणार नाही. तो जसा खेळतो. त्याला तसं स्वीकारावं लागेल. मानावं लागेल.' मौहम्मद कैफनं काही दिवसांपूर्वी असं मत व्यक्त केलं होतं. - सविस्तर वाचा

Aus vs Ind 4th Test : शुभ दिन! गिल, पंत-पुजाराच्या जोरावर टीम इंडियाने ब्रिस्बेमध्ये उधळला गुलाल 
Aus vs Ind 4th Test : ब्रिस्बेनच्या निर्णायक कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद करत मालिका 2-1 अशी जिंकली. - सविस्तर वाचा

आता खासदारांना 50 रुपयांत 'चिकन करी' मिळणार नाही, संसदेतील कँटिनची सबसिडी संपुष्टात
लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात 12 बैठका होणार तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार असल्याची माहिती दिली. - सविस्तर वाचा

शरद पवार शेतकरी आंदोलनात उपस्थित राहणार, नवाब मलिकांनी जाहीर केली तारीख 
दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 23, 24, 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे 25 जानेवारी रोजी सहभागी होणार. - सविस्तर वाचा

लोकहो..! वीजबिल भरलं का? थकबाकी वसूल करण्याचे महावितरणाचे आदेश
वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे आणि थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश आज महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिले आहेत. - सविस्तर वाचा

परीक्षा न देता IAS झाली लोकसभा अध्यक्षांची मुलगी? वाचा काय आहे सत्य
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्लाने परीक्षा न देताच आयएएस झाली आहे. - सविस्तर वाचा

Share Market: सेन्सेक्सची 4 महिन्यातील सर्वात चांगली कामगिरी, निफ्टी 14500 च्या वर 
डिसेंबरच्या तिमाहीत कंपन्यांनी केलेल्या जबरदस्त कामगिरी आणि मजबूत जागतिक संकेतांच्या जोरावर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. - सविस्तर वाचा

यंदाचं बजेट 'पेपरलेस'; जाणून घ्या ब्रीफकेस पासून पेपरलेसपर्यंत झालेला 'बजेट'चा प्रवास
केंद्रीय बजेट सरकारच्या कामकाजातील महत्त्वाची गोष्ट असते. देशातील जनसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी ही घटना असते. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com