esakal | पूजा चव्हाणच्या वडिलांची प्रतिक्रिया, काश्मीरमध्ये स्फोटकं जप्त; सगळं एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

पूजा चव्हाणच्या वडिलांची प्रतिक्रिया, काश्मीरमध्ये स्फोटकं जप्त; सगळं एका क्लिकवर

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज, दोन वर्षे पूर्ण झाली. त्याचवेळी आज काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय.पुण्यात उद्या वाहतुकीच्या मार्गात बदल असणार आहे.

पूजा चव्हाणच्या वडिलांची प्रतिक्रिया, काश्मीरमध्ये स्फोटकं जप्त; सगळं एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महाराष्ट्रात सध्या पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचं प्रकरण प्रचंड गाजतंय. आज, पहिल्यांदा पूजाच्या वडिलांनी याविषयावर प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज, दोन वर्षे पूर्ण झाली. त्याचवेळी आज काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. महाराष्ट्रात गायीच्या दूध खरेदी दरात वाढ करण्यात आलीय तर, बर्ड फ्लू संदर्भात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. पुण्यात उद्या वाहतुकीच्या मार्गात बदल असणार आहे.

नवी दिल्ली :  जम्मू-काश्मीरमधील बस स्टँडमधून 7 किलोची स्फोटकं सापडल्याची माहिती मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दोन वर्षापूर्वी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशात सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. गेल्या 80 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या गोठवणाऱ्या थंडीतही आपल्या निर्धारांसह मागण्यांवर ठाम आहेत. या आंदोलनाला जागतिक पातळीवरुन देखील पांठिब्याचे आवाज उमटले. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. पण अजूनही भारतीयांमध्ये असलेला संताप संपलेला नाही. भारतीय जवानांनी दिलेलं बलिदान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातील पाणी अजूनही सुकलेलं नाही. सविस्तर वाचा

मुंबई : राज्यात 'बर्ड फ्लू'चा कहर अद्याप सुरूच आहे. जळगाव,अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात हा संसर्ग पसरला आहे. खबरदारी म्हणून आतापर्यंत 7 लाख 12 हजार 172 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.  सविस्तर वाचा

पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त सोमवारी (ता.15) शिवाजी रस्ता परिसरातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरासह अन्य गणपती मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सोमवारी शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे, सविस्तर वाचा

पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर महाआघाडी सरकारमधील एक राज्यमंत्राचे नाव या प्रकरणामध्ये पुढे येत आहे, पूजाने आत्महत्या केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत तिचा मोबाईल मिळवा, इतर कोणाच्या हातात मोबाईल पडु देऊ नका, सविस्तर वाचा

परळी वैजनाथ(जि.बीड) : परळी येथील बंजारा समाजाची युवती पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. रविवारी (ता.१४) दिलेल्या प्रतिक्रियेत माझा कोणावरही संशय नाही, असे मत व्यक्त केले आहे. सविस्तर वाचा

पुणे : राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 29 रुपये दूध दर देण्याचा निर्णय राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत शनिवारी (ता.9) एकमताने घेण्यात आला. सविस्तर वाचा

मुंबई : बहुचर्चित अशा राधे श्याम या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या वर्षभरापासून त्याच्याविषयी चर्चा सुरु आहे. या चित्रपटात बाहुबली फेम प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानं सोशल मीडियावर राधेश्यामचा टीझर प्रदर्शित झाल्याची एक पोस्ट व्हायरल केली आहे. सविस्तर वाचा

भारतीय संघाला 198 धावांची आघाडी मिळाली असून दुसऱ्या डावात बॅटिंग करुन ते इंग्लंडला किती धावांचे आव्हान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सविस्तर वाचा