esakal | भांडुप आग प्रकरणी गुन्हा दाखल ते सुएझमधील जहाजामुळे महाराष्ट्र चिंतेत; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

duparchya batmya

राज्यासह देश विदेश आणि मनोरंजन विश्वातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भांडुप आग प्रकरणी गुन्हा दाखल ते सुएझमधील जहाजामुळे महाराष्ट्र चिंतेत; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भांडूपमध्ये लागेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ड्रीम्स मॉल आणि सनराइजच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे फोन टॅपिंग प्रकरणावरून फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे. फडणवीसांना 6.3 जीबीचा पेन ड्राइव्ह कुठून मिळाला. खोट्या माहितीच्या आधारे तक्रार केली का असं त्यांनी विचारलं आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर असून आज त्यांनी जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली. सुएझ कालव्यात अडकलेल्या जहाजामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुएझ कालव्यात वाहतूक ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांचा 1800 कंटेनर भरलेला माल अडकून पडला आहे.  

भांडुपचा ड्रीम्स मॉल आणि सनराईज रुग्णालय अग्नि दुर्घटना प्रकरणात भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ड्रिम्स मॉलचे संचालक आणि सनराईज हॉस्पिटलच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वाचा सविस्तर

सुएझमध्ये अडकलेल्या जहाजानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला; कालव्यात जहाज अडकल्याने आशियातून युरोप आणि अमेरिकेला जहाजातून सुरु असलेली निर्यात खोळंबली आहे. वाचा सविस्तर

अ‍ॅमेझॉन आपल्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत भेटवस्तू देत असल्याचा एक मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. असा मेसेज तुम्हालाही आला असेल तर सावधान. वाचा सविस्तर

पंतप्रधान मोदी शनिवारी सतखिरा इथल्या जेशोरेश्वरी काली मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिरात पूजा अर्चा केल्यानंतर मोदी म्हणाले की, माँ कालीने जगाला कोरोनाच्या संकटातून मुक्त करावं अशी प्रार्थना केली. वाचा सविस्तर

देवेंद्र फडणवीसींना कुठून ६.३ जीबीचा पेन ड्राइव्ह मिळाला. त्यांनी केंद्रीय गृहसचिवांना काय सांगितलं? खोट्या माहितीच्या आधारे तक्रार केली का? यात महाराष्ट्राची बदनामी होतेय, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. वाचा सविस्तर

पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. वाचा सविस्तर

देशातील कोरोनाचा ससंर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यात नाइट कर्फ्यु तसंच अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावर बोलताना हर्षवर्धन यांनी म्हटलं की, 'कोरोनाला रोखण्यासाठी अंशत: लॉकडाऊन फारसं प्रभावी नाही.' वाचा सविस्तर

 खासदार संजय राऊत हे आता शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत. शिवसेनेचे खासदार राहिलेले नाहीत. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. वाचा सविस्तर

प्रियांकाच्या 'सोना' या न्यूयॉर्कमधील नव्या रेस्टॉरंटचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रेस्टॉरंटच्या अधिकृत अकांउटवर शेअर केला आहे. वाचा सविस्तर

प्रदूषणाचा पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर काय परिणाम होतो, यासंदर्भातला एक संशोधन लेख दिया मिर्झाने ट्विटरवर रिट्विट केला आहे. वाचा सविस्तर

 

loading image