esakal | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ते पाच राज्यातला ओपिनियन पोल; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Aaj Divasbharat

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ते पाच राज्यातला ओपिनियन पोल; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. तर दिल्लीतील बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणी अरिझ खान याला दिल्लीच्या साकेत कोर्टानं दोषी ठरवलं आहे. त्याच्या शिक्षेची सुनावणी 15 मार्चला होईल. ब्रिटीश राजघराण्याची सून मेगन मर्केल हिने एका मुलाखतीत धक्कादायक असे आरोप केले आहेत. 

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. गेलं वर्ष कोरोनामध्ये गेल्याने राज्याचं आर्थिक गणित कोलमडले आहे. - वाचा सविस्तर

अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा २०२१- २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. - वाचा सविस्तर

पश्चिम बंगाल (West Bengal), तामिळनाडुसह (Tamilnadu) देशातील पाच राज्यांमध्ये (Assembly Election 2021) विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊ आणि सी वोटरने ओपिनियन पोल जारी केला आहे. - वाचा सविस्तर

बाटला हाऊस एन्काउंटरप्रकरणी दहशतवादी अरिझ खान याला दिल्लीच्या साकेत कोर्टानं दोषी ठरवलं आहे. यानंतर १५ मार्च रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अरिझ खानला दिल्ली पोलिसांनी २०१८ मध्ये नेपाळमधून अटक केली होती. - वाचा सविस्तर

ब्रिटीश राजघराणं खोटारडे असून जाणीवपूर्वक प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप मर्केलनं यावेळी केला. लोकांना ब्रिटनचं राजघराणं म्हणजे स्वप्नांची दुनिया वाटते पण सत्य काही वेगळंच आहे. - वाचा सविस्तर

अलिकडेच माध्यमांमध्ये 'बलात्कारातील आरोपीला महिलेसोबत लग्न करशील का?' असं विचारणारं त्यांचं एक वक्तव्य हे चुकीच्या पद्धतीने पसरवलं गेलं असल्याचं सरन्यायाधीश बोबडे यांनी म्हटलं आहे. - वाचा सविस्तर

अमृता यांनी सोशल मीडियावर आपले गाणे प्रसिध्द होणार असल्याचे सांगितले होते. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांच्या आवडीचा विषय ठरत आहे. - वाचा सविस्तर

वेस्टइंडिज संघाचे माजी कर्णधार व्हिव्हियन रिचर्डस आणि नीना यांचं प्रेमप्रकरण त्यावेळी खुप गाजलं. - वाचा सविस्तर

राज्य सरकारने नवे सात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय प्रवेशाच्या दोन हजार जागा वाढून प्रवेश क्षमता सुमारे ६ हजार ३०० पेक्षा जास्त होणार आहे. - वाचा सविस्तर

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई) मुख्य परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. - वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil

loading image
go to top