दुकानासमोर दारू पिण्यापासून रोखणाऱयाचा खून

टीम ई सकाळ
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : दुकानाच्या दारात दारू प्यायला बसलेल्यांना हटकल्याने दारूड्यांनी केलेल्या चाकुहल्ल्यात नवी दिल्लीत एकाचा मृत्यू झाला. तरूण (वय 26) असे मरण पावलेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ दुर्गेश जखमी झाला आहे. दिल्लीतील मंगोलपूरी भागात गुरूवारी रात्री ही घटना घडल्याचे वृत्त 'हिंदुस्थान टाईम्स'ने दिले आहे.

तरूण आणि दुर्गेश यांच्या दुकानाच्या दारात विशीतले तीन युवक दारू पित दंगा करीत होते. तरूण यांच्या वडिलांनी त्यांना हटकले. तरूणने त्या टोळक्याला दुकानासमोर न बसण्याचा इशारा दिला. त्यावरून हाणामारी सुरू झाली. टोळक्यातल्या एकाने चाकून तरूणला भोसकले. दुर्गेशने भावाला वाचविण्याचा प्रयत्न करताच त्यालाही भोसकले.

तरूणवर टोळक्याने अनेक वार केल्याचे दुर्गेशने पोलिसांना सांगितले. तरूण कोसळताच टोळके पळून गेले. पोलिसांना रात्री नऊच्या सुमारास या घटनेची माहिती देण्यात आली. स्थानिकांनी तरूण आणि दुर्गेशला नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. संशयित टोळक्यांपैकी कोणालाही अजून अटक झालेली नाही. या भागातील दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Marathi News Delhi News in Marathi youth stabbed to death