जमावासमोर हरियाना सरकारने गुडघे टेकले : न्यायालयाचे ताशेरे 

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

शुक्रवारी झालेल्या हिंसेनंतर प्रशासनाने आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली. डेरा सच्चा सौदामधील जमावाला रोखण्यासाठी पोलिस, निमलष्करी दल आणि लष्कराच्या जवानांनी बॅरिकेड्‌स लावल्या आहेत. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या डेराच्या छोट्या कार्यालयामध्ये लष्कराने प्रवेश केला आहे.

सिरसा (हरियाना) : कथित अध्यात्मिक गुरु गुरमीत रामरहीम सिंग याला बलात्कार प्रकरणी दोषी ठरविल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर लष्कर आणि निमलष्करी दलांनी आज (शनिवार) डेरा सच्चा सौदावर धडक कारवाई केली. गुरमीत सिंगच्या हिंसक समर्थकांना पिटाळून लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. 

गुरमीत सिंग याला न्यायालयाने काल (शुक्रवार) दोषी ठरविले. त्यानंतर गुरमीत सिंगच्या समर्थकांनी पंचकुलामध्ये धुडगूस घातला. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या ओबी व्हॅन्ससह इतर वाहनांची जाळपोळ केली. या हिंसक जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये किमान 31 जण ठार झाले. यावरून पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. 'राजकीय फायद्यासाठी तुम्ही संपूर्ण शहर जाळू दिले. जमावासमोर प्रशासनाने गुडगे टेकल्यासारखेच दिसत होते' असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 

गुरमीत राम रहीम चेहऱ्या मागचा खरा चेहरा

शुक्रवारी झालेल्या हिंसेनंतर प्रशासनाने आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली. डेरा सच्चा सौदामधील जमावाला रोखण्यासाठी पोलिस, निमलष्करी दल आणि लष्कराच्या जवानांनी बॅरिकेड्‌स लावल्या आहेत. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या डेराच्या छोट्या कार्यालयामध्ये लष्कराने प्रवेश केला आहे. डेराच्या मुख्यालयामध्ये महिला आणि मुलांसह किमान एक लाख लोक असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या सर्वांनी तिथून निघून जावे, अशा आशयाच्या सूचना ध्वनिवर्धकाद्वारे दिल्या जात आहेत. डेराच्या मुख्यालयामध्ये प्रवेश करण्याचे आदेश अद्याप लष्कराला दिलेले नाहीत, अशी माहिती सिरसाच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिली. 

दरम्यान, पंचकुलामधील कालच्या हिंसाचारानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अधिकृत निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि गुप्तचर यंत्रणांचे अधिकारीदेखील या बैठकीस उपस्थित आहेत.

संत आणि भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचा कट: साक्षी महाराज

'डेरा सच्चा'ची मालमत्ता जप्त करा; झालेले नुकसान वसूल करा : न्यायालय 

गुरमीत सिंगच्या शिक्षेनंतर 'डेरा सच्चा'चे समर्थक हिंसक; पंचकुलामध्ये घातला धुडगूस 

'डेरा सच्चा सौदा'चे गुरमीत सिंग बलात्कार प्रकरणी दोषी

Web Title: marathi news marathi websites Haryana News Dera Saccha Sauda Gurmeet Ram Rahim Singh