esakal | मुंबईत तयार होणार कोरोनावरील लस ते कुंभमेळ्यातून निरंजनी आखाड्याची माघार, ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

मुंबईत तयार होणार कोरोनावरील लस ते कुंभमेळ्यातून निरंजनी आखाड्याची माघार

sakal_logo
By
दिग्विजय जिरगे

-देशात कोरोनाने थैमान घातले असून हरिद्वार येथील कुंभमेळा ही त्याला अपवाद राहिलेला नाही. कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक आणि साधू सामील झाले आहेत. या मेळ्यात आता कोरोनाबाधितांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यातच निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाने निधन झाले आहे. दरम्यान, हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन केला जाणार नाही', असा इशाराच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना दिला आहे. देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

हरिद्वार- कुंभमेळ्यावर कोरोनाचा प्रभाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. या मेळ्यात मोठ्या संख्येने भाविक आणि साधू पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता आखाड्यांनी या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आयोजनातून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यातील कोरोना महामारीचा धोका पाहता प्रमुख 13 आखाड्यांपैकी दोन निरंजनी आखाडा आणि तपोनिधी श्री आनंद आखाडाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर

मुंबई- पोलिसांच्या सौम्य व संयमी वर्तणुकीचा गैरफायदा घेत काही लोक त्यांच्यांशीच वाद घालताना दिसत आहेत. मास्क न लावल्यामुळे पोलिसांना एका नागरिकाला फटकारलं असता, त्या नागरिकाने थेट पोलिसालाच शिवीगाळ केल्याचीही घटना घडली आहे. अशा घटनांनंतर, 'हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन केला जाणार नाही', असा इशाराच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना दिला आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली- कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येदरम्यान देशभरात ऑक्सिजनपासून ते हॉस्पिटलमध्ये बेडच्या कमतरतेवरुन मोठा हाहाकार माजला आहे. याचदरम्यान केंद्र सरकारने गुरुवारी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने पीएम केअर्स फंड अंतर्गत 100 नव्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर

मुंबई - हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. वाचा सविस्तर

पंढरपूर - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी भाजपची नुरा कुस्ती सुरु आहे. हे पहाटेच्या शपथविधीसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत, असा खळबळजनक दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर सभेत केला. वाचा सविस्तर

न्यूयॉर्क - जगभरातील ५७ विकसनशील देशांमधील निम्म्यापेक्षा जास्त महिलांना त्यांच्या जोडीदाराबरोबर शारीरिक संबंधांना नकार देण्याचे स्वातंत्र्य नाही, असा दावा संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका अहवालात करण्यात आला आहे. लैंगिक संबंधांच्यावेळी गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्याचा निर्णय अन आरोग्याची काळजी घेण्याची मागणीही त्या करु शकत नाहीत. वाचा सविस्तर

पुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) एकाच दिवसांत कोरोनामुळे तब्बल ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच एका दिवसातील कोरोना मृत्यूनी शंभराचा आकडा ओलांडला आहे. गुरुवारच्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ४९ मृत्यू आहेत. जिल्ह्यात गुरुवारी ९ हजार ९५६ नवे रुग्ण आढळून आले. वाचा सविस्तर

मुंबई - पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासलेल्या 361 नमुन्यांपैकी तब्बल 220 म्हणजेच 61 टक्के नमुने कोरोनाच्या डबल म्युटंट स्ट्रेनचे असल्याची बाब पुढे आली आहे. हे नमुने जानेवारी ते मार्चदरम्यान राज्यातील विविध भागांतून घेण्यात आले होते. एनआयव्हीकडील आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात ठाणे आणि अकोला जिल्ह्यांत कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, नागपूर, पुणे, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील 50 टक्के नमुन्यांमध्ये हा स्ट्रेन आढळला. या जिल्ह्यातून प्रत्येकी 10 ते 30 नमुने घेण्यात आले होते. वाचा सविस्तर