लाल किल्ला हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूची अटक ते केजरीवाल यांच्या मुलीची फसवणूक, ठळक बातम्या एका क्लिकवर 

Breakfast Updates
Breakfast Updates

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाला होता.या हिंसाचाराप्रकरणी पंजाबी कलाकार दीप सिद्धूवर गंभीर आरोप होते. तो फरार होता. अखेर 14 दिवसांनी दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिच्यासोबत फसवणुकीची घटना घडली आहे. तब्बल 34,000 रुपयांना तिला गंडा बसला आहे. तर काँग्रेसने प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेमागे केंद्र सरकारचाच कट असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. यासह महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

नवी दिल्ली : २६ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या दिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावर बोलताना अनेक मुद्द्यांना हात घातला. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिच्यासोबत फसवणुकीची घटना घडली आहे. तब्बल 34,000 रुपयांना तिला गंडा बसला आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : काँग्रेसने प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेमागे केंद्र सरकारचाच कट असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. वाचा सविस्तर

न्यूयॉर्क : प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये दीड अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याने बिटकॉइनचे मूल्य १५ टक्क्यांनी वाढले. वाचा सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल मे महिन्यात घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेला बसणाऱ्या रिपीटर आणि श्रेणीसुधारची सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा कोणताही लाभ दिला जाणार नाही. वाचा सविस्तर

पुणे : बरोबर ४८ दिवसांनंतर पुणेकर पुन्हा गारठले. यापूर्वी २२ ते २४ डिसेंबरला पुण्यात थंडीचा कडाका वाढला होता. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडी परतली आहे. वाचा सविस्तर

नाशिक : महापालिका निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक असून, त्या अनुषंगाने सर्वच नगरसेवकांना महत्त्वाच्या पदावर काम करण्याची आस लागली आहे. वाचा सविस्तर

नागपूर : ॲथलेटिक्समध्ये नागपूरचीच नव्हे तर विदर्भाची ओळख ही लांबपल्याच्या धावपटूंची. हर्डल्स शर्यतीतील यश दुर्मिळच. वाचा सविस्तर

औरंगाबाद : सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करावे यावरुन राजकारण सुरु आहे. शिवसेना तर अगोदरपासूनच संभाजीनगर असा उल्लेख करत आली आहे. वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com