
चहाच्या वाफाळत्या कपासोबत एक नजर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडींवर... फक्त एका क्लिकवर...
कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस. तर आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज 'किसान गणतंत्र परेड' काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सकाळी राजपथावर ध्वजारोहण केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीनं दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचं ईडीनं मुंबई उच्च न्यायालयाकडे स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस. तर आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन! यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज 'किसान गणतंत्र परेड' काढण्यात येणार आहे. लाखो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून कृषी कायद्यांना विरोध करणारी आपली मागणी पुढे रेटत आहेत...वाचा सविस्तर
नवी दिल्लीः Republic Day 2021- प्रजासत्ताक दिन दरवर्षी 26 जानेवारीला साजरी केला जातो. यादिवशी 1950 ला भारत सरकारने अधिनियम 1935 ला हटवून देशात संविधान लागू केले होते. 26 जानेवारी 1949 ला भारताने संविधान स्वीकारले, पण... वाचा सविस्तर
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीनं दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचं ईडीनं मुंबई उच्च न्यायालयाकडे स्पष्ट केलं आहे. ईडीनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर...वाचा सविस्तर
नवी दिल्लीः नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपवरील भारत सरकारची नाराजी अद्याप कायम आहे. युरोपीयनांपेक्षा भारतातील यूजर्संना व्हॉट्सॲपकडून वेगळी वागणूक दिली जात असल्याचा सूर केंद्र सरकारने उच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये आळवला...वाचा सविस्तर
पुणेः पुण्यातील सोनित सिसोलेकर याने नासाच्या एका स्पर्धेत मंगळग्रहावरील माती लाल का झाली यासंबंधी संशोधन सादर केले. यासह इतर स्पर्धांमध्ये त्याची चमक दाखविली, त्यामुळे त्याला राज्यपातळीवर, राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदकही मिळाले...वाचा सविस्तर
नाशिक रोड: मुंबईकरांना शिर्डीला दर्शनाला सहज जाता यावे, यासाठी रेल्वेने साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक रोडमार्गे मुंबई-साईनगर शिर्डीदरम्यान त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट आरक्षित विशेष गाडी १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली... वाचा सविस्तर
नाशिक: जिल्ह्यात उद्या मंगळवार (ता.26) प्रजासत्ताकदिनापासून प्रशासकीय कामकाजासाठी महसूल यंत्रणतर्फे ई ऑफीस प्रणाली सुरु होणार आहे. त्यात, पहिल्या टप्प्यात प्रमुख विभागाचे कामकाज ऑनलाईन होईल. त्यामुळे...वाचा सविस्तर
औरंगाबाद: टेस्ला कंपनीने भारतात गुंतवणुकीची इच्छा दर्शवल्यानंतरपासून राज्याचा उद्योग विभागाकडून या कंपनीचे संचालक मंडळाच्या संपर्कात आहे. कंपनीचे संचालक एलॉन मस्क यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला आहे. या चर्चेत त्यांनी महाराष्ट्रासाठी सकारात्मकता दर्शविली आहे...वाचा सविस्तर
नागपूर: मोजकेच कार्यकर्ते असणारी राष्ट्रवादी काँग्रेस शहरात अचानक आक्रमक झाली असून तुलनेत काँग्रेस सौम्य झाली आहे. थेट गृहमंत्री अनिल देशमुख आणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल दर आठवड्यात भेटीगाठी, सभा- संमेलने घेत असल्याने राष्ट्रवादीमध्ये उत्साह संचारला आहे...वाचा सविस्तर
नागपूर: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून बाधित पक्ष्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. यामुळे नुकसान होणाऱ्या पशुपालकांसह शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे...वाचा सविस्तर