National Education Day 2022 : का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस ; काय आहे शिक्षक आणि शिक्षण दिनातील फरक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Education Day 2022

National Education Day 2022 : का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस ; काय आहे शिक्षक आणि शिक्षण दिनातील फरक

Maulana Abul Kalam Azad Birth Anniversary : भारतात दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) म्हणून साजरा केला जातो. देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांचा ११ नोव्हेंबर हा जयंती दिन आहे. आझाद हे स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री (1947 ते 1958) होते. आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले होते.

हेही वाचा: National Sandwich Day : जुगारवेड्या तरूणाने लावला सँडविचचा शोध; जाणून घ्या का साजरा केला जातो सँडविच डे !

मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. त्यांचे वडील मोहम्मद खैरुद्दीन हे एक मुस्लिम विद्वान होते. मौलाना आझाद यांचे पूर्ण नाव - मौलाना सैयद अबुल कलाम गुलाम मुहियुद्दीन अहमद बिन खैरुद्दीन अल-हुसैन असे होते. आझाद केवळ 11 वर्षांचे असताना त्याच्या आईचे निधन झाले.

हेही वाचा: National Unity Day : सरदार पटेल यांच्या जयंतीची जय्यत तयारी

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा जुलैखा बेगम यांच्याशी विवाह झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण इस्लामिक पद्धतीने झाले. इस्लामी शिक्षणाव्यतिरिक्त त्यांनी इतर गुरूंकडून विज्ञान, इतिहास आणि गणिताचेही शिक्षण घेतले. अबुल आझाद यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी उर्दू, पर्शियन, हिंदी, अरबी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व मिळवले.

हेही वाचा: United Nations Day : शांततेच्या चर्चेतील दांभिकपणा

तरुणांनीही देशाच्या स्वातत्र्य संग्रामात भाग घ्यावा असे त्यांना वाटत होते. त्यामूळेच आझाद यांनी 1912 मध्ये सप्तकी पत्रिका आणि अल-हिलाल या उर्दू भाषेतील पत्रिका काढण्यास सुरूवात केली. स्वातंत्र्यसंग्राम आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 1992 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा: National Disinfectant Day : NMCच्या वतीने जंतुनाशक गोळी वाटप

आझाद समर्पित स्व-अभ्यासाद्वारे इंग्रजी शिकले आणि बरेच पाश्चात्य तत्त्वज्ञान वाचले. त्यांना पारंपारिक मुस्लिम शिक्षण आवडत नव्हते आणि ते आधुनिक शिक्षणतज्ञ सर सय्यद अहमद खान यांच्या विचारांशी सहमत होते.

हेही वाचा: National Film Day : शुक्रवारी चित्रपट स्वस्त दरात पाहण्याची संधी; ७५ रुपये तिकीट

आझाद हे एक उत्तम वक्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण आणि तांत्रिक शिक्षणाबरोबरच वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत सर्व मुलांसाठी मोफत सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण सुरू केले. त्यांनी महिलांच्या शिक्षणावर भर दिला.

हेही वाचा: National Cinema Day : सिनेमाप्रेमींसाठी खुशखबर! 'या' दिवशी देशात Movie Ticket फक्त ७५ रुपये

समाजाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येपर्यंत म्हणजेच महिलांपर्यंत पोहोचल्याशिवाय राष्ट्रीय शिक्षणाचा कोणताही कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. असेही त्यांचे विचार होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले. २००८ मध्ये, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांचा वाढदिवस शिक्षण दिन म्हणून ओळखला जातो. तेव्हापासून दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा: National Nachos Day- नाजोचचे हे प्रकार नक्की करून पाहा

आझाद यांनी संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी, साहित्य अकादमी या संस्थांची स्थापना केली. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्ससह आजच्या बहुतांश प्रमुख सांस्कृतिक आणि साहित्यिक अकादमींची स्थापना. त्यांच्या कार्यकाळात झाली आहे. आयआयटी, आयआयएसटी देशात सुरू करण्यात आझाद यांचे भरीव योगदान होते.

हेही वाचा: National Apple Day - सफरचंद खाण्याचे हे आहेत 8 फायदे

शिक्षक दिन आणि शिक्षण दिन फरक

दरवर्षी ५ सप्टेंबरला भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो. डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. या दिवशी देशभर राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

हेही वाचा: National Noodle Day : नूडल्स खा मस्त रहा!

शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तर, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री असलेल्या अबुल आझाद यांचा जन्मदिन हा शिक्षण दिन म्हणून साजरा करतात. अबुल आझाद एक स्वातंत्र्यसैनिकही होते. स्वातंत्र लढ्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.