esakal | चर्चा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची ते शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल, ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

home minister anil deshmukh know about all Mumbai Mansukh hiren case solved Maharashtra ats fb post

पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि सट्टेबाजारी करणारा बुकी नरेश गोर याला रविवारी महाराष्ट्र एटीएसने अटक केली.

चर्चा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची ते शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल, ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

परमबीर सिंग हे मुंबई पोलिसांमधील एक महत्वाचं नाव. मनसुख हिरेन प्रकरणात दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन त्यांना तडकाफडकी हटवण्यात आलं. त्यानंतर नाराज असलेल्या परमबीर सिंग यांनी एका लेटरबॉम्बद्वारे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी जे सांगितलं ते अर्धसत्य आहे, असा दावा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारं सविस्तर आठ पानी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. या पत्रावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभा असलेल्या गाडीमध्ये स्पोटक सापडल्याप्रकरणी २५ फेब्रुवारी रोजी ग्रामदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास NIA आणि ATS कडे होता. मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेले पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि सट्टेबाजारी करणारा बुकी नरेश गोर याला रविवारी महाराष्ट्र एटीएसने अटक केली. त्यानंतर शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणाचा गुंता सुटल्याचे सांगितले. 


मुंबई - परमबीर सिंग यापूर्वीही अनेकदा चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोपही झाले आहेत. या आरोपांची मालिका काय आहे जाणून घेवूयात. - वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी जे सांगितलं ते अर्धसत्य आहे, असा दावा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.. - वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारं सविस्तर आठ पानी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.. - वाचा सविस्तर 

 मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले होते, असा खळबळजनक परमबीर सिंग यांन आपल्या आठ पानाच्या पत्रात केला आहे. - वाचा सविस्तर 

 मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएस महराष्ट्रकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणी तपास केल्यानंतर रविवारी या प्रकरणाचं गूढ उकलण्यात महाराष्ट्र एटीएसला यश आल्याचं शिवदीप लांडे यांनी सांगितलं. - वाचा सविस्तर 

 मुंबई - या प्रकरणाची सखोल चौकशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्युलियो रिबेरो यांच्यासारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत करावी", अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेत ज्युलियो रिबेरो यांच्या नावाचा उल्लेख केला. - वाचा सविस्तर 

पुणे - रविवारी दुपार पासून अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुण्यातही काही भागात जोरदार तर काही ठिकाणी पावसाचा तुरळक शिडकावा झाला.- वाचा सविस्तर 

पुणे - पैसे गोळा करण्याच्या टेन्शनमध्ये दुचाकीवरून रॉंग टर्नमध्ये घुसलेल्या या पित्याला वाहतूक पोलिस आणि आरोग्य मित्रांच्या सहकार्यामुळे मुलीच्या जीवदानाचाच यु टर्न मिळाला.- वाचा सविस्तर 

पुणे - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत बारामतीत रविवारी (ता. 21) भाजपाच्या वतीने आंदोलन केले.- वाचा सविस्तर 

मनोरंजन - दोन दिवसांपूर्वी फाटलेली जीन्स घातली यावरुन उत्तराखंडच्या मुख्यंमंत्री तीरथ सिंह यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यावरुन नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे.- वाचा सविस्तर 

मनोरंजन - आमीरची मुलगी इरा ही सोशल मीडियावर तिच्या हटके प्रतिक्रियेमुळे चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. तिला फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. - वाचा सविस्तर