चीनबाबत नेहरुंनी केलेली चूक मोदी पुन्हा करतायत

modi jinping
modi jinping

मुंबई-चीन हा भारतातील प्रत्येक सरकारला मुर्ख बनवत आला आहे. मग ते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार असो की अटल बिहारी वाजपायी किंवा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार असो. या सर्व सरकारांनी चीन आपला मित्र राष्ट्र आहे म्हणत करोडो भारतीयांना भ्रमित केलं आहे. अनेक स्तंभलेखकांनी भारत आणि चीन हे कधीच शत्रू नव्हते आणि महासत्ता होण्यासाठी दोन्ही राष्ट्र एकमेकांना मदत करतील, असं म्हटलं आहे. त्यांच्या बिनडोक आणि हास्यास्पद कवीकल्पना चीनने भारताच्या 20 जवानांना मारल्याने उघड्या पडल्या आहेत. पाकिस्तान आणि नेपाळला हाताशी धरुन चीन भारताला उद्धवस्त  करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर स्वत:ला शस्त्रसज्ज केलं नाही, तर चीन भारताच्या विनाशाला कारणीभूत ठरु शकतो.

2000 ते 2005 वर्षांमध्ये चीनच्या प्रतिनिधीमंडळाला मुंबईच्या कुलाब्यातील उच्च सुरक्षा नौदल डॉकयार्डमध्ये थेट प्रवेश देण्यात आला होता. यावेळी टाईम्स ऑफ इंडियाचा पत्रकार म्हणून मी तेथे उपस्थिती होतो. भारतीय नागरिकांना या डॉकयार्डमध्ये पूर्णपणे प्रवेशबंदी आहे. धक्कादायक म्हणजे डॉकयार्डमध्ये चिनी प्रतिनिधींना कुठेही फिरण्याची आणि  तेथील फोटो घेण्याची मुभा देण्यास आली होती.ही स्टोरी कवर करुन मी टाईम्सच्या कार्यलयात आलो आणि मी जे अनुभवल त्याचा रिपोर्ट सादर केला. तेव्हाचे कार्यकारी संपादक (आताचे संपादकीय संचालक) जयदीप बोस यांना फोन करुन मी ही स्टोरी करत असल्याचं सांगितलं. मात्र, स्थानिक संपादक दिना वकील यांनी या स्टोरीला कमी लेखलं. चार दिवसानंतर टाईम्स ऑफ इंडियाच्या मुंबई इंडिशनमध्ये ह्या स्टोरीसाठी एका कॉलमची जागा देण्यात आली.

भारतातील संरक्षण पीआरओ आणि मंत्र्यांच्या कृपा प्रसादामुळे चीनला भारतीय लष्करातील उपकरणांबाबत खूप काही माहिती आहे. याउलट भारतीय मीडिया सतत चीन आणि भारतातील संबंध कसे सुधारत आहेत याबाबत माहिती देत असते.

1962 साली माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी चीनकडून चांगलाच धडा शिकला आहे. मात्र, नरेंद्र मोदी पुन्हा तीच चूक करत आहेत. चीनने गलवान खोरे आपल्या ताब्यात घेतले आहे. तसेच तेथे शस्त्रास्त्रांची जमवाजमव केली आहे. त्यामुळे भारताने सैन्य उपकरणे जमवून चीनला तोंड दिले पाहिजे. मात्र, मोदी ते टाळू इच्छित आहेत. 

चीनने जेव्हा तिबेटला गिळंकृत केले, तेव्हा तिबेट हा चीनचा भाग असल्याचं सर्वात आधी भारतानेच मान्य केलं होतं. भारताने त्यावेळी चीनला विरोध केला नव्हता आणि आताही जर आपण शांत बसलो तर आपण विस्तारवादी चीनच्या जाळ्यात अडकणार आहोत. माओने  त्यावेळी तिबेट आमचा तळहात असल्याचं म्हटलं होतं. तो आम्ही घेतला आहे, यापुढे त्याची पाच बोटे म्हणजे लडाख, नेपाळ, भुतान, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता शांत बसणे म्हणजे चीनला संधी देण्यासारखं आहे. चीनने याआधीच लडाखचा काही भाग जिंकला आहे, तसेच अरुणाचल प्रदेशावर आपला ताबा सांगितला आहे.

2015 आणि 2020 च्या सॅटेलाईट फोटोंद्वारे चीनने गलवान खोरे आणि पेंगोंग व्हॅलीचा अधिकांश भाग ताब्यात घेतल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मोदी यांनी भारताचा कुठलाच भाग चीनच्या ताब्यात नाही हे सांगणे बंद करावे. चिनी सैनिक 8 किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत आले आहे. त्यामुळे मोदींनी जनतेला खोटे न सांगता परिस्थितीला सामोरे जावे.

चीन आणि भारत कधीच मित्र होऊ शकत नाहीत हे कठोर सत्य आहे. गरज पडल्यास आपल्याला चीनसोबत युद्ध करावे लागेल. आपल्या शत्रू क्रमांक 1 समोर आपण शरणागती पत्करली तर आपल्याला लडाख, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमचा बराचसा भाग गमवावा लागू शकतो. चीनला भारताचे दोन तुकडे करायचे आहेत. मात्र, आपण गप्प बसलो तर त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com