India’s 13-day journey from Pahalgam terror attack to air strike on Pakistan : भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी दहशतवाद्यांची ९ ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. भारताने केलेल्या या हल्ल्यात ८० ते ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
या हल्ल्यात भारताचा मोस्ट वाँटेट दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणही ठार झाले आहेत. या कारवाईला भारताने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आहे. पहलगाम हल्ल्याच्या १३ दिवसानंतर भारताकडून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या १३ दिवसांत नेमकं काय काय घडलं? जाणून घेऊया..