परिक्षेसंदर्भातील भीती दुर करा, मोदींचे विद्यार्थ्यांना आवाहन

'परीक्षा पे चर्चा'दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
PM Modi interacts with students during pariksha Pe charcha
PM Modi interacts with students during pariksha Pe charchaसकाळ डिजिटल टीम

'परीक्षा पे चर्चा' (Pariksha pe Charcha 2022) दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बोर्डाची परीक्षा देणाऱ्या आणि इतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणखी वाढवण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय गेल्या चार वर्षांपासून 'परीक्षा पे चर्चा' सत्राचे आयोजन करत आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातील विद्यार्थी या कार्यक्रमाला प्रचंड मोठा प्रतिसाद देतात. (PM Modi interacts with students during pariksha Pe charcha)

PM Modi interacts with students during pariksha Pe charcha
काश्मीर फाईल्सवर टीका करणाऱ्या पवारांना अग्निहोत्री म्हणतो दुटप्पी; म्हणाला...

सध्या देशात परिक्षेचा काळ सुरु आहे. अशात विद्यार्थ्यांंचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. परीक्षा ही आपल्या आयुष्यातील एक महत्तवपुर्ण पायरी असल्याचे मोदी म्हणाले.

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी घाबरुन जाऊ नये. सोबत परिक्षेत कॉपी करण्याची गरज नाही, तुम्ही जे काही करता, ते पूर्ण आत्मविश्वासाने करत राहा, असे आवाहनही मोदी यांनी विद्यार्थ्यांना केले.

PM Modi interacts with students during pariksha Pe charcha
सत्तेत येताच भगवंत मान यांचा मोदींना दणका, केंद्राविरोधात आणला ठराव

ऑफलाईन आणि ऑनलाईन परिक्षेवरुन मध्यंतरी बरेच वाद झाले. यावर बोलताना मोदी म्हणाले, ऑफलाइन ऑनलाईन सारखेच आहे . माध्यम ही समस्या नाही. कोणत्याही माध्यमाची पर्वा न करता परिक्षा द्यावी. आपले मन जर विषयात गुंतले , तर काही फरक पडणार नाही.

पुढे मोदी यांनी तंत्रज्ञानाविषयी भाष्य करताना म्हटले, "तुमच्यात असलेले कौशल्ये खूप महत्त्वाचे आहेत. तंत्रज्ञान हे त्रासदायक नाही मात्र त्याचा योग्य वापर केला पाहिजे. आज विद्यार्थी तंत्रज्ञान आपल्या कार्यक्षमतेने वापरत आहेत."

PM Modi interacts with students during pariksha Pe charcha
हे एप्रिल फुल नव्हे! गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले

चांगले गुण मिळवण्यासाठी शिक्षक आणि पालकांकडून त्यांच्यावर दबाव आहे असे विद्यार्थ्यांना वाटू नये. पालकांनी तसा आग्रह धरु नये. त्यांना त्यांचे भविष्याचा विचार करण्याची मुभा द्यावी, असेही मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com