महागाईचा विक्रम मोडीत ते काश्मीर पंडिताची हत्या, दिवसातील 5 मोठ्या बातम्या | News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inflation

महागाईचा विक्रम मोडीत ते काश्मीर पंडिताची हत्या, दिवसातील 5 मोठ्या बातम्या

नवी दिल्ली : किरकोळ महागाईच्या (Retail Inflation) दरात गेल्या 8 वर्षांचा विक्रम एप्रिलमध्ये मोडीत निघाला आहे. मार्चमध्ये किरकोळ महागाई दर 7.79% वर पोहोचला आहे. इंधन आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाई दरात कमालीची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये एका काश्मिरी पंडिताची (Kashmir Pandit) दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तर, ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि न्यायालयाचे आयुक्त बदलण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. याशिवाय गुरुवारपासून उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करण्यात आले आहे. (Today's Top Five News)

हेही वाचा: अयोध्या दौरा : राज ठाकरेंना आता भोजपुरी गाण्यातून इशारा!

महागाईचा 8 वर्षातील विक्रम मोडीत

वाढत्या महागाईने आधीच कंबरडे मोडलेल्या सामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे. किरकोळ महागाई दरात गेल्या 8 वर्षांचा विक्रम एप्रिलमध्ये मोडला गेला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, CPI आधारित किरकोळ महागाई दर मार्चमध्ये 7.79% पर्यंत वाढला आहे. इंधन आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाई दरात कमालीची वाढ झाली आहे. तर, किरकोळ महागाई 2 ते 6 टक्‍क्‍यांच्या श्रेणीत ठेवण्याचे आदेश केंद्राने आरबीआयला दिले आहेत. मार्चमध्ये किरकोळ महागाई दर 6.95 टक्के होता. सविस्तर वाचा>>

बडगाममध्ये काश्मीर पंडिताची हत्या

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांनी त्यांचा नापाक कारस्थानाला प्रोत्साहन देत खोऱ्यातील काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा त्रास देण्यास सुरुवात केली असून, आज दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयातील एक काश्मीर पंडित असणाऱ्या कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा >>

हेही वाचा: घरातून बाहेर काढलेल्यांवर काय बोलायचे ?, ओवैसींची राज ठाकरेंवर टीका

ज्ञानवापी मशिद सर्व्हेक्षणाची याचिका फेटाळली

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि न्यायालयाचे आयुक्त बदलण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. आयुक्तांना हटवण्याची याचिका फेटाळताना मशिदीच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासन आणि पोलीस आयुक्तांना दिले आहेत. आयोगाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत मुख्य सचिव आणि डीजीपींना देखरेख ठेवण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य

गुरुवारपासून उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी 9 मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकार्‍यांना याबाबत आदेश जारी केले आहेत. पांडे यांनी आदेशात म्हटले आहे की, 24 मार्च रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे. रमजान महिन्यात मदरशांमध्ये 30 मार्च ते 11 मे या कालावधीत सुट्टी जाहीर करण्यात आली होती आणि 12 मे पासून नियमित वर्ग सुरू झाले होते, त्यामुळे आजपासून हा आदेश लागू झाल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा >>

हेही वाचा: परदेशात जाणाऱ्यांसाठी 'बूस्टर डोस'; कोविनवर सुरू होणार नोंदणी

श्रीलंकेचे माजी पंतप्रधानांना देश सोडण्यास बंदी

श्रीलंकेतील एका न्यायालयाने मंगळवारी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या मुलासह 15 जणांना देश सोडून जाण्यास बंदी घातली आहे. याशिवाय शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण कसे लागले? याचा तपास करण्याचे आदेशही कोलंबो न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाला होता.

सविस्तर वाचा >>

Web Title: Retail Inflation Rise To Kashmiri Pandit Murdered In Jk Read Today Top 5 News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top