सोनिया गांधींच्या निवास्थानाचं भाडं थकीत, RTI मधून माहिती उघड

sonia gandhi
sonia gandhi
Summary

काँग्रेस नेत्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या भाड्याची किती रक्कम थकीत आहे? याला आता मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे.

नवी दिली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) निवडणुकीच्या प्रचारात कुठेही दिसलेल्या नाहीत. आता भाजपच्या (BJP) आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी सोनिया गांधी यांच्यावर आता गंभीर असा आरोप केला आहे. त्यांनी माहिती अधिकारा अंतर्गत मिळालेली माहिती शेअर केली आहे. सोनिया गांधी यांनी गेल्या दीड वर्षापासून घराचे भाडे भरले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधींनी प्रवासी कामागारांच्या तिकिटाला पैसे देण्यावरून बरीच आश्वासने दिली. पण त्यांनी स्वत:च्या घराचे भाडे दीड वर्षापासून भरलेलं नाही.

गुजरातमधील सुजित पटेल यांनी RTI अतंर्गत माहिती मागवली होती. त्यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाला विचारलं होतं की, काँग्रेस नेत्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या भाड्याची किती रक्कम थकीत आहे? याला आता मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे. यानुसार, २६ अकबर रोडचे १२ लाखांहून अधिक भाडे थकीत आहे. तर सोनिया गांधी यांचे सरकारी निवसास्थान असलेल्या १० जनपथचे चार हजार तर दिल्लीच्या चाणक्यपुरीतील अजय या निवसस्थानाचे पाच लाखांहून जास्त रुपये भाडे देणे बाकी आहे.

sonia gandhi
UP चं केरळमध्ये रुपांतर झाल्यास काय होईल? एका मुख्यमंत्र्याचा दुसऱ्यावर पलटवार

निवासस्थानाचे भाडे थकीत असल्यावरून आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर भाजपने टीका केली आहे. वर्गणी काढून ती रक्कम सोनिया गांधींना पाठवणार असं ट्विट भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी केलं आहे. जर वर्गणी त्यांचे भाड्याचे पैसे देण्याइतकी झाली तर त्यांना पाठवण्यात येईल. यासाठी चक्क SoniaGandhiReliefFund असा हॅशटॅग सुरु करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com