
Tahawwur Rana First Photo: मुंबई हल्ल्यातील अर्थात 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याची प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण होऊन त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आलं आहे. दिवसभरत त्याच्या भारतात येण्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या पण आता त्याचा भारतात पोहोचल्यानंतरचा फोटोही समोर आला आहे. त्याचबरोबर तहव्वूर राणाची केस भारतातील एका वकिलानं घेतली आहे. त्यामुळं आता राणा भारताच्या ताब्यात आल्यानंतर आणखी काही महत्वाचे पुरावे भारताच्या हाती येऊ शकतात.