राजधानीत कोरोनाची तिसरी लाट

नवी दिल्ली: धुके आणि जाळण्यात येणाऱ्या काडीकचऱ्यामुळे हवा प्रदूषित होत आहे. बुधवार सकाळच्या वेळी बाह्यवळण मार्गावरचे चित्र.
नवी दिल्ली: धुके आणि जाळण्यात येणाऱ्या काडीकचऱ्यामुळे हवा प्रदूषित होत आहे. बुधवार सकाळच्या वेळी बाह्यवळण मार्गावरचे चित्र.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मागील किमान ३ ते ४ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढता वाढता आज ७ हजारांच्या घरात गेली. कोरोनाची स्थिती पाहता दिल्ली परिसरात महामारीची तिसरी लाट आल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याचे  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मान्य केले आहे. यावर उद्या (ता. ५) उच्चस्तरीय आढावा बैठक घेणार आहोत, असेही ते म्हणाले. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली सरकार बाजारपेठा, मॉल व गर्दीच्या ठिकाणी सरसकट चाचण्या करण्याचा गंभीरपणे विचार करत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली गृहमंत्रालयात झालेल्या बैठकीत या पर्यायाचा गंभीरपणे विचार करण्याचे ठरविण्यात आले. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत दिल्लीत ६७२५ नवे सक्रिय कोरोनाग्रस्त आढळले. राज्य सरकार केंद्राच्या साहाय्याने आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचेही नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेले दोन दिवस पुन्हा नव्या रुग्णांची संख्या ४ हजारांच्या पुढे जात आहे. 

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ही कोरोनाची तिसरी लाट असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, की कोरोना रुग्णालयांतील ६८०० खाटांवर सध्या रूग्ण असून आणखी ९००० खाटा रिकाम्या आहेत. गेले १५ दिवस राज्य सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली व त्याचा परिणाम रुग्णसंख्येच्या वाढीवर झाला असेही त्यांनी सांगितले.

कंटेनमेंट झोन वाढू लागले
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमुळे कंटेनमेंट झोनची संख्या दिल्लीत पुन्हा वाढू लागली आहे. सध्या घरातच विलिगीकरणाची सुविधा राज्य सरकारने दिली असली तरी गंभीर रुग्णांना रुग्णालयांत हलविणे क्रमप्राप्त ठरत आहे. याआधी मुख्यतः दाटीवाटीच्या वस्त्यांमध्येच रुग्णसंख्या आढळत असे. मात्र कोरोना रुग्णाचा नव्याने झालेला फैलाव उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांच्या वसाहतींपर्यंत असल्याचे आढळणे हा राज्य सरकारची चिंता वाढवणारा भाग असल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाही टाळाटाळ केल्याचा आरोप होणाऱ्या खासगी रुग्णालयांतील ८० टक्के काटा कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता. त्यालाही दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

का वाढला कोरोना
राजधानीत कोरोनाचा प्रभाव किंचित ओसरताच एकामागोमाग एक व्यवहार सुरू करण्यास दिलेली परवानगी, सणासुदीच्या काळात बाजारपेठांत उसळणारी गर्दी, नागरिकांकडून मास्क लावण्यासह आरोग्य नियमांची सर्रास ऐशीतैशी आणि त्यात विषारी हवेचे प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम दिल्लीतील कोरोनारुग्ण वाढण्यात झाला आहे. 

कॉंन्टँट ट्रेसिंग मोहिम
दिल्लीमध्ये आजमितीस ३६३७५ रुग्ण कोरोनाग्रस्त असून आतापर्यंत ३,६०,०६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ६६५२ रुग्णांनी प्राण गमावले आहे. आरोग्यमंत्री जैन यांनी म्हणाले, की मागील पंधरा दिवसांत रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या करण्यासाठी आक्रमपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहिम राबविल्यामुळेही ही रुग्णसंख्या वाढलेली असू शकते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com