Big Breaking : CBSE आणि ICSE ने दहावी-बारावीच्या परीक्षा केल्या रद्द, विद्यार्थ्यांना असे मिळणार गुण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

सीबीएसईने राहिलेले पेपर 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान घेणार असल्याचं म्हटलं होतं. यासाठी सविस्तर वेळापत्रकही जारी करण्यात आलं होतं.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरु असलेल्या अनेक परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सीबीएसईने राहिलेले पेपर 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान घेणार असल्याचं म्हटलं होतं. यासाठी सविस्तर वेळापत्रकही जारी करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. याला देशातील अनेक राज्यांनी समर्थन दिलं होतं. 

जपानी कंपन्यांसाठी रेझ्युम कसा लिहावा वाचा सविस्तर

केंद्रीय माधय्मिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ने यंदाच्या शैक्षणिक वर्षातील 10 वी आणि 12 वीच्या 1 जुलैपासून उर्वरीत परीक्षा रद्द केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी बोर्डाकडून या निर्णयाची माहिती देण्यात आली. याशिवाय निकाल 15 जुलैपर्यंत देण्याची तयारी असल्याचेही बोर्डाकडून सांगण्यात आले. कोणत्या आधारे निकाल देण्यात येतील याबाबत बोर्डाने न्यायालयात सविस्तर बाजू मांडली. 
सीबीएसई आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून सॉलिसिटर जनलर तुषार मेहता यांनी बाजू मांडली. दिल्ली, ओडिसा आणि महाराष्ट्र सरकारकडून परीक्षा न घेण्याबाबतचे म्हणणे ऋषी मल्होत्रा यांनी मांडले. 

वडील चालवायचे चहाचं दुकान, मुलगी झाली IAF फायटर पायलट

मनुष्यबळ विकास मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, दहावीच्या इंटरनल असेसमेंटवरून निकाल तयार करणं सोपं आहे. मात्र 12 वीच्या परीक्षेचे निकाल असे तयार करण्यात अडचण येईळ. कारण 12 वीच्या गुणांवर आयआयटी, मेडिकलसह इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला जातो. शाळेच्या इंटरनल असेसमेंटमध्ये अनेक हुशार विद्यार्थीही मागे पडू शकतात. 

हे वाचा - ​एक कोटी रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC चा अभ्यास सुरु केला आणि...

बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत दोन पर्याय सांगितले होते. शाळेत झालेल्या गेल्या तीन परीक्षांमधील गुणांच्या आधारे आता गुण दिले जावेत किंवा काही महिन्यांनी होणाऱ्या इम्प्रूव्हमेंट परीक्षेतही बसता येईल. ज्यांना गुण वाढवायचे आहेत त्यांच्याकडे इम्प्रूव्हमेंट एक्झामचा पर्याय आहे. 
हे वाचा : खेडेगावातून थेट ऑक्सफर्ड ते पुन्हा भारतात, वयाच्या 27 व्या वर्षी बनली IPS

सीबीएसई शिवाय आसीएसईच्या परीक्षासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूने परीक्षा घेण्यामध्ये असमर्थता दर्शवली होती. तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आयसीएसईनेसुद्धा दहावी आणि 12 वी च्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र आयसीएसई विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याचा पर्याय देण्याबाबत सकारात्मक नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cbse an icse cancelled 10th and 12 th exam scheduled from 1 jully centre says to sc