गणेशोत्सवासाठी व्हॉट्सॲप शुभेच्छा शोधताय? वाचा एकापेक्षा एक भारी शुभेच्छा l Ganesh Chaturthi 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Utsav 2022: Special Ganeshotsav Whatsapp Wishes

गणेशोत्सवासाठी व्हॉट्सॲप शुभेच्छा शोधताय? वाचा एकापेक्षा एक भारी शुभेच्छा

येणाऱ्या गणेशोत्सवासाची ठिकठिकाणी संपूर्ण तयारी झाली असून उद्या ढोलताशांच्या गजरात सगळीकडे बाप्पाचं जोरदार स्वागत करण्यात येईल. सोशल मीडियावरही बाप्पाच्या आगमनाचा सायलेंट गजर तुम्हाला दरवर्षी व्हॉट्सअॅप मॅसेजच्या माध्यमातून बघायला मिळतच असेल. यंदाच्या गणेश महोत्सवी (Ganeshotsav) तुम्ही बाप्पाच्या आगमनाआधीच तुमच्या जवळच्यांना काही खास मॅसेज पाठवण्यासाठी शोधाशोध करत असाल तर खालील शुभेच्छांचे मॅसेज तुम्हाला उपयोगी ठरतील.

1. मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

3. बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो
उंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो
बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो
प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

हेही वाचा: Ganesh Utsav: यंदा बाप्पाच्या आगमनी ट्राय करा हटके नव्वारी लूक

4. बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धावूनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

5. गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2022: बाप्पाला अजिबात अर्पण करू नका या गोष्टी, नाही तर रूसेल..

6. कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
आहे आम्हाला सार्थ विश्वास
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

7. बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धावूनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Web Title: Ganesh Chaturthi 2022 Special Quote Whatsapp Message Status To Share

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..