'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठा दुपारपूर्वीच का केली पाहिजे?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 September 2019

घरांत, चौकाचौकांतील गणपती मंडळांत गणेशोत्सव साजरा होत असला, तरी प्राणप्रतिष्ठापना झाल्याखेरीज गणेशोत्सवाला प्रारंभ होऊच शकत नाही. गणेशोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा, अनिवार्य भाग म्हणजेच श्रींची स्थापना - प्राणप्रतिष्ठापना.

घरांत, चौकाचौकांतील गणपती मंडळांत गणेशोत्सव साजरा होत असला, तरी प्राणप्रतिष्ठापना झाल्याखेरीज गणेशोत्सवाला प्रारंभ होऊच शकत नाही. गणेशोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा, अनिवार्य भाग म्हणजेच श्रींची स्थापना - प्राणप्रतिष्ठापना.

प्राणप्रतिष्ठापना दुपारी जेवणापूर्वी करणे चांगले. श्री गणेश चतुर्थीच्या सकाळी सूर्योदयापासून दुपारी सूर्य मस्तकावर येईपर्यंत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना होईल, याची सर्वांनी काळजी घ्यावी. दुपारचे जेवण करून सुस्तपणे संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत आपल्या लहरीप्रमाणे प्राणप्रतिष्ठा करणे, (घरी अथवा सार्वजनिक ठिकाणी) म्हणजे घरी आलेल्या प्रतिष्ठित पाहुण्याला उपाशी ठेवून आपण जेवून घेण्यासारखे आहे. 

प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त 
दुपारी बारा वाजण्यापूर्वी 'श्रीं'च्या मूर्तीला 21 दूर्वांची जुडी, सुवासिक गुलाब, जास्वंद, कमळ, केवडा, चाफा, जाई-जुई सारख्या सुगंधी फुलांसह अष्टगंध, शेंदूर, केशरी, चंदन अर्पण करावे. एकवीस किंवा शक्‍य तेवढ्या मोदकांचा किंवा कोणत्याही मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवूनच भोजन करावे.

दुपारी बारा वाजण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा करणे अशक्‍यच असेल तर निदान 'चित्रा' नक्षत्राच्या काळात म्हणजेच अपराह्णकाळी 3.58 पर्यंत तरी मध्यममार्ग म्हणून प्राणप्रतिष्ठापूजन, नैवेद्य, आरती करावी. 
 

गणेश पुजनाची योग्य वेळ कोणती?
का करावी गणपतीची पूजा? जाणुन घ्या शास्त्र
गणपतीपुढे का म्हणतो आपण अथर्वशीर्ष?
गणपती अन् समज गैरसमज​
'श्रीं'ची मूर्ती कशी असावी?​
गणेशाची मुर्तीची उंची किती असावी?​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Ganesh Sthapana should be done before noon