"अल कायदा'चे भारतीय उपखंडातील सामर्थ्य वाढते आहे: तज्ज्ञांचा इशारा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जुलै 2017

अफगाणिस्तानमधील आता अल कायदाचा प्रभाव मागील पाच ते दहा वर्षांपेक्षाही जास्त प्रमाणात वाढल्याचे मत सेथ जी जोन्स या व्यूहात्मक राजकारणामधील तज्ज्ञाने व्यक्त केले

वॉशिंग्टन - अल- कायदा ही जागतिक दहशतवादी संघटना "भारतीय उपखंडात' जास्त सक्रिय होत असल्याचा इशारा दहशतवादसंदर्भातील विषयांसंदर्भातील अमेरिकेतील तज्ञांनी दिला आहे. या दहशतवादी संघटनेचे सर्वात जास्त "स्लीपर सेल्स' अफगाणिस्तानमध्ये आहेत; तर याचे जास्तीत जास्त "ऑपरेटिव्हज' बांगलादेशमध्ये असल्याची माहिती अमेरिकेच्या कायदेमंडळास देण्यात आली आहे.

या वर्षी (2017) भारतीय उपखंडात शंभरहून जास्त अल कायदा "सदस्य' सक्रिय झाले आहेत. अफगाणिस्तानमधील हेलमंड, कंदाहार, झाबुल, पाक्तिया, गझनी और नुरिस्तान या भागात या दहशतवादी संघटनेचे "स्लीपर सेल्स' आल्याचे निष्पन्न झाले आहे. अफगाणिस्तानमधील आता अल कायदाचा प्रभाव मागील पाच ते दहा वर्षांपेक्षाही जास्त प्रमाणात वाढल्याचे मत सेथ जी जोन्स या व्यूहात्मक राजकारणामधील तज्ज्ञाने व्यक्त केले. जोन्स यांनी येथील लोक प्रतिनिधीगृहामधील सुरक्षा समितीसमोर "दहशतवादविरोध व गोपनीय माहिती' याबाबत बोलताना ही माहिती दिली.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे वाढलेले सामर्थ्य हे भारतीय उपखंडात अल कायद्याचा विस्तार होण्यामागील एक महत्त्वपूर्ण कारण आहे. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान वा लश्‍कर-ए-झांगवी या इतर दहशतवादी संघटनांशीही अल कायदाचे संबंध असल्याचे आढळून आले आहे. भारतीय उपखंडात अल कायदा आपल्या अस-सहाब या "माध्यम शाखे'द्वारे प्रचार करत असल्याची माहिती जोन्स यांनी दिली. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलेला अल कायदाचा म्होरक्‍या अयमान अल-जवाहिरी याने भारतीय उपखंडात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तयारी करत असल्याचे सूचित केले होते.
 

■ ई सकाळवरील महत्वाच्या ताज्या बातम्या 
परभणी: दूबार पेरणीच्या संकटाने युवकाची आत्महत्या
साहेब, आम्ही दारिद्र्यातच जीवन जगावे का?
बारामती-फलटण रेल्वेमार्ग संपादनासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची अपेक्षा
सिंधुदुर्ग-कणकवली रेल्वे मार्गावर माती कोसळल्याने रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प
मराठवाड्यात मुलीच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याने संपविले जीवन
गेल्या महिन्याभरात साडेतीन हजार "चाईल्ड पोर्नोग्राफी' साईट्‌स बंद
नांदेडमध्ये वाहतूक शाखेची अडीच महिण्यात दमदार कारवाई
पुणेः नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करणारे दांपत्य ताब्यात
'एलआयसी'चे एयर इंडिया करू नका !; 'जीएसटी'ही काढा
भारतातील "फेसबुक युजर्स'ची संख्या जगातील सर्वोच्च...

Web Title: Al-Qaida in Indian subcontinent getting more active