China News : चीनमध्ये चक्क प्रेमात पडायला विद्यार्थ्यांना मिळाली एका आठवड्याची सुट्टी

१ एप्रिल ते ७ एप्रिल या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टी असणार आहे.
China News
China News sakal

China News : चीन नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत असतो. सध्या चीनमध्ये विद्यार्थ्यांना सात दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही म्हणाल, यात काय नवीन.. मुळात ही सुट्टी सण समारंभामुळे नाही तर एका खास कारणामुळे देण्यात आली आहे.

चीनच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रेमात पडण्यासाठी सात दिवसाची सुट्टी दिली आहे. १ एप्रिल ते ७ एप्रिल या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलाय. (China made a unique plan and giving their students a week to fall in love to save china falling birth rate )

चीन सध्या कमी जन्म दराचा सामना करत आहे. त्यामुळे भविष्यात ही राष्ट्रीय आपत्ती होऊ नये, यासाठी चीन पावले उचलत आहे. अशात चीनने बर्थ रेट वाढविण्याचाही विचार केला. यामुळेच चीनच्या अनेक कॉलेजमध्ये एक अनोखा उपक्रम सुरू केलाय. या योजनेला स्प्रिंग ब्रेक (spring break) नाव दिले आहे. रिपोर्टनुसार अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रेम शोधण्यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुट्टी देण्यात आली आहे.

China News
China Gold Treasure: ८ वर्षांच्या खोदाईनंतर मिळाला सोन्याचा प्रचंड मोठा साठा!

फॅन मेई एजुकेशन ग्रुप द्वारा संचालित नऊ कॉलेजपैकी एका कॉलेजमध्ये, मियायांग फ्लाइंग वोकेशनल कॉलेजनी पहिल्यांदा 21 मार्चला स्प्रिंग ब्रेकची घोषणा केली होती. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना असं सांगण्यात आलं होतं की विद्यार्थांनी आपलं खरं प्रेम शोधावं. अशा प्रकारे 1 एप्रिलपासून 7 एप्रिलपर्यंत सुट्टीची घोषणा करण्यात आली. विद्यार्थांना प्रोत्साहीत करण्यात आले.

विशेष म्हणजे या दिवसांमध्ये कॉलेजनी विद्यार्थ्यांना होमवर्कसुद्धा दिले. सरकारच्या आदेशावरुन कॉलेज प्रशासन या द्वारे जन्मदर वाढवण्यास प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

China News
India-China : भूटानच्या पंतप्रधानांचे चीनबाबत मोठं वक्तव्य; भारताची चिंता वाढली

चीनने 1980 आणि 2015 दरम्यान वन चाइल्ड पॉलिसी मोठ्या प्रमाणात जनसंख्या नियंत्रण आणण्यास फोकस ठेवला होता. त्यानंंतर कमी जन्मदर बघता 2021 मध्ये मुलं जन्माला घालण्याचं बंधन एक वरुन तीनवर करण्यात आलं. नोकरीची कमतरता, कमी पगार आणि एकमेकांना वेळ देत नसल्यामुळे जन्मदर आणखी कमी झालाय. त्यामुळे चीन सरकार चिंतेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com