युक्रेनच्या ओडेसामध्ये रशियाचे हल्ले; क्षेपणास्त्र हल्ल्यात १९ जणांचा मृत्यू

Missile Attack 19 People Dead
Missile Attack 19 People DeadMissile Attack 19 People Dead

युक्रेनच्या ओडेसा बंदर शहराजवळील तटीय शहरामधील इमारतींवर शुक्रवारी (ता. १) रशियाने क्षेपणास्त्र हल्ला (Missile Attack) केला. या हल्ल्यात किमान १९ लोक ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. स्नेक बेटावरून रशियन सैन्याने गुरुवारी माघार घेतल्याने हा हल्ला झाला आहे. हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये ओडेसाच्या नैऋत्येस सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सेर्हिव्हका या छोट्या शहरातील इमारतींचा ढिगारा दिसत आहे.

रशियाने (Russia) डागलेल्या तीन X-२२ क्षेपणास्त्रांनी एक इमारत आणि दोन छावण्यांना धडक दिली, असे युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने सांगितले. एक दहशतवादी राज्य आमच्या लोकांना मारत आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ आंद्रे येरमाक म्हणाले. या हल्ल्यात दोन मुलांसह १९ जणांचा मृत्यू झाला आहे. सहा मुले आणि गर्भवतीसह ३८ जण रुग्णालयात दाखल आहेत. बहुतांश बळी हे निवासी इमारतींमधील रहिवासी आहेत, असे युक्रेनच्या सुरक्षा सेवेने सांगितले.

Missile Attack 19 People Dead
ममता बॅनर्जी म्हणाल्या, द्रौपदी मुर्मूबद्दल अगोदर सांगितले असते तर...

हल्ल्याच्या एकदिवस आधी रशियन (Russia) सैन्याने स्नेक बेटावरून माघार घेतली. यामुळे युक्रेनच्या ओडेसा या प्रमुख बंदर शहराला असलेला धोका कमी झाला आहे. मात्र, रशियन सैन्य पूर्वेकडील लुहान्स्क प्रांताला वेढा घालण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. क्रेमलिनने (रशियन अध्यक्षीय कार्यालय) स्नेक बेटावरून सैन्य मागे घेण्यास सद्भावना संकेत म्हणून संबोधले आहे.

पूर्व युक्रेनमधील (Ukraine) रशियन सैन्य डोनबास प्रदेशाच्याअंतर्गत असलेल्या दोन प्रांतांपैकी एक असलेल्या लुहान्स्कमधील युक्रेनियन लष्करी प्रतिकाराचा शेवटचा गड असलेल्या लुहान्स्कला वेढा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. रशिया लिसिचांस्क शहराला वेढा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरातील जुनी तेल शुद्धीकरण केंद्र ताब्यात घेण्यासाठी लढत आहे. शहरात भीषण बॉम्बस्फोट सुरू आहेत, असे लुहान्स्कचे गव्हर्नर सेर्ही हेडाई म्हणाले.

Missile Attack 19 People Dead
नूपुर शर्मावरील टिप्पणी मागे घ्यावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

तीन दिवसांत कारखाना घेतला ताब्यात

रशियन आणि लुहान्स्क फुटीरतावादी सैन्याने तीन दिवसांत लिसिचान्स्कमधील रिफायनरी तसेच एक खाण आणि जिलेटिन कारखाना ताब्यात घेतला आहे, असे रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी शुक्रवारी सांगितले. २४ तासांत रशियाच्या अनेक हल्ल्यांमध्ये पूर्व युक्रेनमध्ये नागरिकांचाही मृत्यू झाला आहे, असे युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com