90 डिग्री वाकली होती मान, पाकिस्तानी मुलीला दिले भारतीय डॉक्टरांनी नवं जीवदान

दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर राजगोपालन कृष्णन यांनी अफ़शीनच्या आयुष्याला नवी कलाटणी दिली.
surgery
surgerysakal

सोशल मीडियावर अनेक नववनीन गोष्टी व्हायरल होत असतात. अशातच पाकिस्तानची एका मुलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पाकिस्तान मुलीची मान 90 डिग्री वाकलेली होती. त्यामुळे तिचं आयुष्य पुर्णपणे विस्कटलेलं होतं मात्र भारताच्या एका डॉक्टरांनी तिला नवं आयुष्य दिलं.

या मुलीचं नाव अफ़शीन आहे. अफ़शीनची मान लहानपणी एका अपघातात 90 डिग्री वाकली आणि तेव्हापासून ती तशीच होती. यामुळे ती शाळेत जाऊ शकत नव्हती आणि खेळू पण शकत नव्हती. पण एका भारतीय डॉक्टरांनी अफ़शीनवर मोफत शस्त्रक्रिया करत तिला नवं आयुष्य दिलंय. दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर राजगोपालन कृष्णन यांनी अफ़शीनच्या आयुष्याला नवी कलाटणी दिली.

surgery
Global Warming | मराठवाडा आणखी तापणार, पाऊसही वाढणार !

अफ़शीन पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहते.फक्त 10 महीन्याची असताना एका अपघातात तीची मान 90 डिग्री वाकली गेली. अफशीनचे आई वडिल तिच्या या उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे गेले पण काहीही फायदा झाला नाही. वाढत्या वयासोबत अफ़शीनच्या वाकलेल्या मानेचा त्रासही वाढत होता. यात तिच्या आईवडिलांकडे उपचारासाठी पैसेही नव्हते.

12 वर्षापासून अफ़शीन हे दु:ख सहन करत होती. ती शाळेत जाऊ शकत नव्हती, ती खेळू शकत नव्हती एवढंच काय तर तिला खाणे, पिणे, बोलणे तसेच नीट चालताही येत नव्हते.

surgery
Video Viral: चप्पल घालून विजय प्रमोशनला गेला, रणवीरनं उडवली टर!


अपघातानंतर अफ़शीनच्या कुटुंबीयांना वाटले की, आपल्या तिची मान वेळेनुसार सुधारेल मात्र तसे काहीही झाले नाही. उलट तिला सेरेब्रल पाल्सीचा त्रास व्हायला लागला. सेरेब्रल पाल्सीमुळे शरीराची हालचाल, पोश्चर आणि संतुलन बिघडते.सोबतच बऱ्याच प्रकरणांमध्ये रुग्णांच्या ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या क्षमतेवरही देखील वाईट परिणाम दिसून येतो.

surgery
Viral Video: 'हर-हर शंभू!' गाणारी शाळकरी मुलगी 'अभिलिप्सा पंड्डा' आहे कोण?

अफ़शीनचे आईवडिल अनेक डॉक्टरांकडे तिला घेऊन गेले त्यांनी औषधे दिली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मात्र वारंवार उपचाराचा खर्च उचलणे कुटूंबाना शक्य नव्हते. ब्रिटिश पत्रकार अलेक्जेंड्रिया थॉमस यांनी अफ़शीनची कहाणी प्रकाशित केली आणि कुटुंबाला डॉ. कृष्णन यांच्याशी संपर्क करुन दिला, डॉक्टर राजगोपालन कृष्णन यांनी अफ़शीनवर विनामूल्य यशस्वी शस्त्रक्रिया केली.

अफ़शीनचे कुटुंब नोव्हेंबर 2021 मध्ये उपचारासाठी भारतात आले होते. अफ़शीनच्या शस्त्रक्रियेसाठी ऑनलाइन फंडिग जमा करण्यात आली अफ़शीनवर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ. कृष्णन म्हणाले की, जर योग्य वेळी शस्त्रक्रिया झाली नसती तर कदाचित अफ़शीन जास्त काळ जगली नसती. कदाचित जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण असावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com