कँडी खाण्याच्या बदल्यात 61 लाखांचा पगार, 5 वर्षांची मुलंही करू शकतात अर्ज | Job Advertisement Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

candy

कँडी खाण्याच्या बदल्यात 61 लाखांचा पगार, 5 वर्षांची मुलंही करू शकतात अर्ज

आपल्या आवडीची नोकरी मिळावी,असे प्रत्येकाला वाटत असते. कॅनेडात एका कंपनीकडून असाच एक जॉब ऑफर करण्यात आलाय. हो, खाण्याच्या शौकीन असण्यासाठी हा जॉब परफेक्ट आहे कारण ही कंपनी वर्षभर कँडी खाण्याच्या बदल्यात चक्क 61 लाख रुपयांचा पगार देणार आहे. तुम्हाला हे खरं वाटणार नाही, पण हे खरंय. चीफ कँडी ऑफिसर असं या पदाचं नाव आहे. (The Canadian company is looking to hire a chief candy officer advertisement goes viral)

लोकांसाठी कँडी फनहाउस नावाच्या ऑनलाईन रिटेल कंपनीने ही ऑफर दिली आहे. ज्या व्यक्तीला कँडीज खाणे आवडते त्यांच्यासाठी हा उत्तम जॉब आहे.कारण आवडीचं खायला जर पैसे मिळत असेल तर कोणाला हा जॉब करावासा वाटणार नाही.

विशेष म्हणजे यासोबतच कर्मचाऱ्याला अनेक सुविधा मिळणार.याशिवाय या जॉबसाठी कर्मचाऱयाला ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, त्याला हे काम घरातूनच करावं लागणार आहे. ही कंपनी कँडीजची विक्री करते.यासाठी विक्रीपुर्वी कँडींची टेस्ट घेणाऱ्या व्यक्तीची कंपनीला गरज आहे.

या जॉबसाठी वयाचे बंधन नाही. आईवडिलांची परवानगी असेल तर 5 वर्षीय मुलगा देखील अर्ज करू शकतो. कंपनीने या संदर्भात जाहीरात दिली असून सोशल मीडियावर याची जाहीरात प्रचंड व्हायरल झाली आहे.या जाहीरातीवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहे.