रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांना दिलासा; देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हळू हळू सरकारकडून काही सेवा सुरु करण्यावर भर देत आहेत. यातच रेल्वेने आता नव्या स्पेशल ट्रेन सुरु कऱण्यास मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम आता शिथिल केले जात आहेत. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हळू हळू सरकारकडून काही सेवा सुरु करण्यावर भर देत आहेत. यातच रेल्वेने आता नव्या स्पेशल ट्रेन सुरु कऱण्यास मंजुरी दिली आहे. कोरोनाने जगातील अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम केले आहेत. यातीलच एक म्हणजे भविष्यात जगातील दीड अब्ज लोक दारिद्रय रेषेखाली जातील असं जागतिक बँकेनं स्पष्ट केलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या वाढदिनी रशियाने आपले सर्वात शक्तीशाली हायपरसोनिक क्रूज मिसाईल जिरकॉनचे यशस्वी परीक्षण घेतले आहे.

'MPSC'ने घेतला महत्त्वाचा निर्णय; निकालाच्या पारदर्शकेसाठी उचललं मोठं पाऊल
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) निकाल जाहीर केल्यानंतर उमेदवारांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकेची मुळप्रत स्कॅन करून त्यांच्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे निकालाबाबत साशंकता असल्यास त्वरित त्याची पडताळणी करणे शक्‍य होणार आहे. कधीपासून कोणत्या परीक्षेसाठी मिळणार सुविधा वाचा सविस्तर

महाराष्ट्रात धावणार पाच इंटरसिटी एक्स्प्रेस; देशात आणखी 39 स्पेशल ट्रेन
 देशभरात सुरु करण्यात येणाऱ्या 39 ट्रेन्समध्ये मुंबईतून एलटीटी, बांद्रा, मुंबई सेंट्रल इथून आणि पुणे, नागपूर इथूनही एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. मध्य रेल्वेने कोणत्या पाच इंटरसिटी एक्स्प्रेस सुरु केल्या याबद्दल वाचा सविस्तर

'माझ्या ट्रॅक्टरवरील सोफा दिसतो पण पंतप्रधानांसाठीच्या आलिशान विमानाबाबत कोण बोलणार?'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे जे विमान आहे तेच मोदी यांना हवं आहे. त्यासाठी लोकांचे कोट्यवधी रुपये खर्च झाले असल्याचं सांगत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना सवाल केला. तसंच ट्रॅक्टरवर लावलेल्या सोफ्याबद्दल काय म्हणाले राहुल गांधी वाचा सविस्तर

सोशल डिस्टन्सिंगसाठी नवीन फॉर्म्युला; संसर्गाच्या जोखमीबाबत WHO च्या आयोगाचा अभ्यास
जागतिक आरोग्य संघटनेने नेमलेल्या आयोगाने कोरोनाच्या सामूहिक संसर्गाच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंगवर अभ्यास केला आहे. त्यात म्हटले की एक मीटरपेक्षा कमी अंतर असेल तर संसर्ग हेाण्याची जोखीम १२.८ टक्के आहे तर एक मीटरपेक्षा अधिक अंतर असेल तर ही जोखमी २.६ टक्केच राहते. वाचा सविस्तर

जगात दीड अब्ज लोकं जातील दारिद्र्य रेषेखाली; भारतात असेल गंभीर परिस्थिती 
कोरोनानंतरच्या अर्थव्यवस्थेबाबत Economy जागतिक बँकेने गंभीर इशारा दिला आहे. जगातील सर्वच देशांनी कोरोनानंतरच्या वेगळ्या अर्थव्यवस्थेसाठी तयार रहायला हवं, असं जागतिक बँकेनं म्हटलंय.  भारतातील परिस्थितीबाबत काय म्हटलंय वाचा सविस्तर

पुतिन यांचा वाढदिवस; रशियाने डागली जगातील सर्वात घातक क्रूज मिसाईल
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा आज (बुधवार, 7 सप्टेंबर) वाढदिवस असून याच दिवशी रशियाने एका मिसाइलची चाचणी घेतली. या मिसाईलने ध्वनीच्या वेगापेक्षा 8 पट वेगाने सागरातील एका फेक टार्गेटला उद्धवस्त केले. वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top news indian railway special train mpsc who covid 19 russia putin world bank rahul gandhi