इतके वर्ष पाळावे लागणार सोशल डिस्टन्सिंग; अन्यथा पुन्हा साथ येणार..

social distancing
social distancing

वॉशिंग्टन ः कोरोनाविरुद्धची प्रतिबंधक लस अद्याप तयार नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग तसेच गर्दी टाळणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे किमान 2022 पर्यंत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोनाची साथ पुन्हा उद्भवू शकतो, असा इशारा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दिला आहे.

केवळ आत्ता लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळवता येणार नाही. नव्याने कोरोनाची साथ आल्यास जास्त गंभीर असेल असेही त्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक लस तयार न झाल्यास ही साथ पुन्हा येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. कोरोना प्रत्येक हिवाळ्यात येऊ शकतो. हे टाळण्यासाठी सुरक्षित अंतर हाच उपाय आहे. अमेरिकेतील कोरोनाचा प्रभाव आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. देशातील काही राज्यातील सर्व यंत्रणा या महिन्यातच खुली होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सांगत असतानाच हा अहवाल जाहीर झाला आहे. 

लागण झालेले आणि त्याची लागण वेगाने होण्याचा धोका असलेल्या व्यक्ती असल्यास रोग जास्त वेगाने पसरतो. रोगप्रतिबंधक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्यास धोका जास्त असतो, असे हॉवर्डमधील साथीच्या रोग्याचे अभ्यासकांनी म्हंटले आहे. त्यांनी शाळा बंद ठेवणे, गर्दीचे कार्यक्रमास प्रतिबंध, घरातच राहण्याचा आदेश हे अजून काही वर्ष अमलात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. 

लोकांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावे यासाठीचे उपाय अमलात आणल्यास त्याचा अर्थव्यवस्था, शैक्षणिक प्रगतीवर प्रतिकुल परिणाम होईल. त्यामुळेच कोरोना रोखण्यासाठी हाच एकमेव उपाय असू नये, हे आम्ही जाणतो असेही या अभ्यासकांनी म्हटले आहे. एकदा कोरोनाची लागण झालेल्यांना पुन्हा त्याची लागण होऊ शकते का याबाबत आत्ताच काहीही सांगता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com