
युद्ध करु नका ! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचे रशियन सैनिकांना आवाहन
किव्ह : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की (Volodimyr Zelensky) यांनी शनिवारी रात्री उशीरा रशियन भाषेत रशियन सैनिकांना युक्रेनमध्ये युद्ध न लढण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की रशियाचे लष्करी अधिकारी जाणतात की युक्रेन युद्धात हजारो रशियन सैनिक मारले जाऊ शकतात. रशिया आपल्या सैन्य तुकडीत नवीन लष्कर भरती करत असल्याचे झेलेन्स्की म्हणाले. त्यांना युद्ध लढण्याचा अनुभव खूपच कमी आहे. रशियाचे (Russia) कमांडर जाणून आहेत, की आगामी आठवड्यात हजारो सैनिक मारले जातील आणि हजारो अन्य जखमी होतील. (Zelensky Appeal To Russian Soldiers Not Fight)
झेलेन्स्की म्हणाले, रशियन कमांडर आपल्या सैनिकांशी खोट बोलत आहेत, की युद्ध लढण्यास नकार दिल्यास त्यांच्याविरुद्ध गंभीर कारवाई केली जाऊ शकते. ते त्यांना सांगत नाही, की रशियन सैन्याचे मृतदेह ठेवण्यासाठी अतिरिक्त रेफ्रिजरेटर ट्रकची व्यवस्था करित आहेत.
रशियन लष्करी अधिकाऱ्यांना भविष्यात होणाऱ्या नुकसानाविषयी काही सांगितले जात नाही. प्रत्येक रशियन सैनिक आताही आपला जीव वाचवू शकतात. तुम्ही आमच्या भूमित येऊन शहीद होण्यापेक्षा तुम्ही रशियातच राहावे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले.