नाश्त्यात करा सूजीचा वापर; हृदयरोग ते मधूमेहाचा आजार, सगळ्यांवर गुणकारी

suji
suji

नवी दिल्ली : सूजीचा वापर अनेक घरांमध्ये जास्तीकरुन वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्यासाठीच केला जातो. सूजी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते. जर आपण अनहेल्दी पदार्थ सोडून सूजीचा वापर नाश्त्यासाठी करु लागला तर आपल्याला यातील प्रोटीनचे घटक आरोग्यदायी ठरु शकतात. सूजीमध्ये कोलेस्ट्रोलचे प्रमाण अजिबातच नसते. त्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशरसारखी समस्या उद्भवण्याच्या शक्यता अत्यंत कमी असतात. जर आपल्याला आरोग्यदायी आयुष्य जगायचं असेल तर आपण सूजीचा वापर केला पाहिजे. सूजी आपल्या शरीरातील अनेक समस्यांना दूर करण्यासाठी मदत करते. एक नजर टाकूयात सूजीच्या फायद्यांवर...

1. डायबेटीज झालेल्यांसाठी फायदेशीर
सूजीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स ( glycemic index) खूपच कमी प्रमाणात असतो. त्यामुळे शरीरात शुगर वाढण्याचा धोका कमी होतो. मैद्याच्या तुलनेत रक्तात शोषण करण्यासाठी जास्तवेळ लावतो जेणेकरुन रक्तात साखर कमी अथवा जास्त होण्याचा धोका राहत नाही. 
2. स्थूलपणा कमी करते
सूजीमध्ये फायबरचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे खाल्लेलं पचायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. यामुळे आपल्या शरीराचा स्थूलपणा कमी करण्यासाठी देखील सूजीचा वापर चांगल्या पद्धतीने होतो.
3. एनर्जी वाढवण्यासाठी मदत
सूजीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीरात कायम एनर्जी योग्य प्रमाणात टिकून राहते. जर आपण नाश्ता म्हणून सकाळी याचं सेवन कराल तर दिवसभर आपल्याला शरीरासाठी आवश्यक उर्जा मिळू शकते. 

हेही वाचा - अंगांना मुंग्या येत असल्यास नका करू दुर्लक्ष! ५ कारणे ठरतात जबाबदार
4. शरारीसाठी संतुलित आहार
सूजीमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. जसे की फायबर, विटामिन-बी कॉम्प्लेक्स आणि विटामिन- ई तसेच यामध्ये फॅट, कोलेस्ट्रोल आणि सोडीयम सापडत नाही. सूजीमध्ये मिनरल्सचे प्रमाण देखील अधिक असते. 

5. हृदयरोगांवर गुणकारी
सूजीचा वापर खाण्यासाठी केल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुलभ होते. त्यामुळे हार्ट अटॅकसारखा धोकादायक रोग होण्याची शक्यता कमी होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com