वर्क फ्रॉम होम करताय? या छोट्या छोट्या गोष्टींकडे द्या लक्ष

वर्क फ्रॉम होम करताय? या छोट्या छोट्या गोष्टींकडे द्या लक्ष

नागपूर : दीड वर्षापासून कोरोना व्हायरससोबतची लढाई सुरूच आहे. या व्हायरसची लागण आपल्याला होऊ नये म्हणून सगळ्यांना घरी आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला देखील देण्यात आला. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची सूट दिली आहे. तसेच काहींना बंधनकारक केले आहे. यामुळे अनेकांवर वर्क फ्रॉम होम करण्याची वेळ आली आहे. आता याचा त्रास जाणवू लागला आहे. (Coronavirus-Work-from-home-Safty-Health-effects-nad86)

वर्क फ्रॉम होम करताना शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जसजसा काळ उलटत गेला तसतसे घर बसल्या काम कंटाळवाणेही वाटू लागले आहे. अनेकांना घरबसल्या तणाव आणि आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झालेले हे बदल धोकादायकही ठरू शकतात. त्यामुळे काम करताना शरीराची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

वर्क फ्रॉम होम करताय? या छोट्या छोट्या गोष्टींकडे द्या लक्ष
अमानुष प्रकार! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा

बसण्याची स्थिती बदलत रहा

तासनतास लॅपटॉप आणि कॅम्प्युटरसमोर बसल्याने थकवा तसेच डोक्याला ताण पडतो व अवघडल्या सारखे वाटते. म्हणून थोडावेळ जागेवरून उठावे आणि काही वेळ विश्रांती घ्यावी. काम करताना शरीराची हालचाल करावी. कारण, एकाच ठिकाणी त्याच अवस्थेत बसून राहिल्याने शरीराला याचा त्रास होऊ शकतो. म्हणून काम करत असताना अधून मधून बसण्याची स्थिती बदलत रहा.

स्क्रीन डोळ्यापासून दूर ठेवा

घरातून काम करताना आसनव्यवस्थेकडे दुर्लक्ष करू नका. पाठीच्या कण्याला आराम देणारी खुर्ची वापरा. पाठदुखीचा त्रास होऊ नये म्हणून थोड्या थोड्या अंतराने उभे रहा. अधूनमधून स्ट्रेचिंग करा. सतत लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर काम करीत असल्याने डोळ्यांना अंधूक दृष्टी, डोळ्यांची जळजळ इतर समस्या उद्भवू शकतात. लॅपटॉप किंवा कम्प्युटरची स्क्रीन डोळ्यापासून सुमारे एक फूट अंतरावर असावी. जेणेकरून डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही.

वर्क फ्रॉम होम करताय? या छोट्या छोट्या गोष्टींकडे द्या लक्ष
नागपुरात डबल मर्डर : पोलिसांच्या नाकावर टिच्चून शक्तिमानचा खून

न चुकता दररोज व्यायाम करा

वर्क फ्रॉम होममुळे नैराश्य, तणाव, चिंता आणि दु:खाच्या भावना उद्भवू शकतात. जास्त तास काम केल्यामुळे थकवा देखील जाणवू शकतो. कॅम्प्युटरवर काम करताना हातांचे कोपरे बऱ्याच कालावधीसाठी एकाच स्थितीत राहतात. अशाने हाताचे स्नायू आखडून दुखण्याचा त्रास होतो. म्हणून थोडावेळ हातांना आराम द्यावा व हातांचा व्यायाम करावा. न चुकता दररोज व्यायाम करा.

विविध पर्याय निवडा

तणावमुक्त राहण्यासाठी एरोबिक्स, इमारतीच्या आवारात सायकल चालविणे, घरच्या घरी चालणे, योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन सारखे पर्याय निवडू शकता. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटते. शिवाय, मानसिक आणि शारीरिक थकवा देखील दूर होतो.

(Coronavirus-Work-from-home-Safty-Health-effects-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com