esakal | दुसरा डोस घेण्यास उशिर झाल्यास काय? जाणून घ्या प्रश्नांची उत्तरे

बोलून बातमी शोधा

Vaccine

लसीकरणाचा तुटवडा असल्यामुळे एक मे रोजी सुरु होणारं लसीकरण मोहिम पुढे ढकलण्यात आलं आहे. लसीकरणाच्या तुटवड्यामुळे दुसऱ्या डोसला उशीर होत आहे.

दुसरा डोस घेण्यास उशिर झाल्यास काय? जाणून घ्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला आहे. दररोज शेकडोंचे प्राण जात आहेत. आरोग्य व्यवस्था रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमही राबवण्यात आली आहे. पण लसीकरणाचा तुटवडा असल्यामुळे एक मे रोजी सुरु होणारं लसीकरण मोहिम पुढे ढकलण्यात आलं आहे. लसीकरणाच्या तुटवड्यामुळे दुसऱ्या डोसला उशीर होत आहे. दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर काय? यासारखे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात आले असतील. नवभारत टाईम्स या संकेतस्थळानं अशाच काही प्रश्नांच्या उत्तरासाठी आयसीएमआरमधील कम्युनिटी मेडिसिन एक्सपर्ट, डॉ. अरुण शर्मा यांची मुलाखत घेतली आहे.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधा झाल्यानंतर दुसरा डोस कधी घ्यावा? अॅपवर उशीरानं रजिस्ट्रेशन होईल का?

कोरोना लसीसाठीचं रजिस्ट्रेशन फक्त एकवेळा करावं लागते. दुसऱ्यांदा त्याची गरज नाही. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी 6 ते 8 आठवडे आहे. पहिल्या डोसनंतर कोरोनाची बादा झाला तर घाबरुन जाऊ नका. कोरोनामुक्त झाल्यानंतर 6 ते 8 आठव्यानंतर दुसरा डोस घेऊ शकता.

हेही वाचा: टायफाइडमध्ये नेमका कोणता आहार घ्यावा? वाचा सविस्तर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लोक लस घेण्यासाठी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. तर अशा परिस्थितीत लस उशीरा घेतल्यास चालेल का?

एक मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. हा कार्यक्रम यापुढेही चालूच राहणार आहे. आपल्या सोयीनुसार लोकांनी लसीचे डोस घ्यावेत. जितक्या लवकर लस घ्याल तितकं फायद्याचं आहे.

दोन वेगवेगळ्या लसीचं डोस घ्यावेत का?

नाही, पहिला डोस घेतलेल्या कंपनीचाच दुसराही डोस घ्यावा. दोन्ही डोससाठी दोन वेगवेगळ्या लसी घेऊ नये.

हेही वाचा: PCOD च्या समस्येवर 'या' बिया ठरतात गुणकारी, एकदा खा अन् चमत्कार बघा

दुसऱ्या डोससाठी नवीन दरानुसार किंमत चुकवावी लागेल का?

सरकारी रुग्णालयात सध्या लसीकरण मोफत केलं जात आहे. यापुढेही मोफतच मिळेल. खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी गेला असाल तर तेथील दरानुसार तुम्हाला किंमत चुकवावी लागेल.

सर्वांना रजिस्ट्रेशन करावं लागेल की लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी?

18 ते 44 वर्षांवरील लोकांना रजिस्ट्रेशन केल्याशिवाय लस मिळणार नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस मिळणार नाही.

हेही वाचा: रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे १३ आयुर्वेदिक मार्ग

दुसऱ्या डोससाठी उशीर होत असेल तर काय करावं?

लसीच्या दुसऱ्या डोसचा कालावधी 4 ते 12 आठवडे आहे. या कालावधीतच दुसरा डोस घेण्याचा प्रयत्न करा. यापेक्षा जास्त कालावधी लागल्यास पहिल्या डोसचा प्रभाव कमी होऊ शकतो. दुसऱ्या लसीच्या डोससाठी उशीर झाल्यास अँटीबॉडी मिळणार नाही.

इतर कोणत्या कागदपत्राद्वारे लस घेऊ शकतो का?

कागदपत्रांमध्ये पत्ता आणि फोन क्रमांक जवळपास सारखाच असतो. पण, लसीकरणासाठी इतर कागदपत्राच वापर करु नये. असं केल्यास तुमचेच नुकसान आहे.

हेही वाचा: लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?

कोव्हिशील्ड लसीचे दोन डोस घेतल्यानंतर इतर लस घ्यावी का? घ्यायची असल्यास किती कालावधीनंतर?

आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार, एका व्यक्तीनं फक्त एकाच प्रकारची लस घ्यावी. देशात सध्या दोन लसीचा वापर केला जात आहे. सध्याच्या घडीला तर दोन वेगवेगळ्या लसी घ्यायची गरज नाही.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर तयार होणाऱ्या अँटीबॉडीज कधीपर्यंत राहतील? की ही लस काही कालावधीनंतर पुन्हा घ्यावी लागेल?

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 14 दिवसानंतर शरिरात अँटीबॉडीज तयार होतात. पण या किती दिवसांपर्यंत राहतात याबाबत कोणतीही माहिती नाही. सध्या लस घेतल्यानंतरच्या प्रक्रियेवर संशोधन सुरु आहे. संशोधन पूर्ण झाल्यानंतर लसीचा प्रभाव किती दिवसांपर्यंत राहिल, याबाबतची माहिती समजेल.

हेही वाचा: आहारात करा ५ पदार्थांचा समावेश; होणार नाहीत लशीचे साईड इफेक्ट्स

काही लोकांना लस घेतल्यानंतर कमकुवतपणा येत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी काही लोक ताकदीच्या गोळ्या घेत आहेत. हे गरजेचं आहे का?

लस घेतल्यानंतर कमकुवतपणा येत नाही, असे कोणतेही साइड इफेक्टस दिसले नाहीत. अशा प्रकारच्या कोणत्याही अफवेकडे लक्ष देऊ नका.

लसीकरणानंतर ताप आल्यास, तो लसीचा साइड इफेक्ट आहे की कोरोनामुळे आलेला ताप ?

लसीकरणानंतर 24 तासांत ताप आल्यास तो एआयएपआय असेल. जर ताप जास्त कालावधीपर्यंत राहिला तर आरटीपीसीआर चाचणी करुन घ्या. जर चाचणी निगेटिव्ह आल्यास ताप लसीकरणामुळे आला असं समजा.

हेही वाचा: मेनोपॉजमध्ये ताणतणाव का जाणवतो? वाचा कोणत्या काळात घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

मासिक पाळीदरम्यान लस घेतली तर चालेल का?

मासिक पाळीदरम्यान महिला अथवा तरुणी लस घेऊ शकतात. याचा लसीकरणाशी काहीही संबध नाही.

लसीकरणानंतर तरुणी आई होऊ शकत नाही, अशी अफवा आहे, सत्य नेमकं काय आहे?

अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आतापर्यंत असं कोणत्याही संशोधनात समोर आलं नाही. न घाबरता लस घ्या.

हेही वाचा: महिलांना गर्भपातानंतर का होतो मानसिक त्रास? वाचा सविस्तर

लस घेतल्यानंतर जिममध्ये जाऊ शकतो का?

लस घेतल्यानंतर लगेच जिममध्ये जाऊ नका. काही काळानंतर जिममध्ये जा..

लस घेतल्यानंतर मद्यप्राशन करु शकतो?

अशापद्धतीची कोणतीही गाइडलाइन नाही. पण आठवडाभर मद्यप्राशन करु नका.

कोरोना पॉझिटिव्ह असेल तर लस घ्यावी का?

नाही, आधी कोरोनाचा उपचार करा. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर लस घ्या. कोरोनाच्या नियमांनुसार पॉझिटिव्ह आल्यानंतर लसीकरण करा. कारण, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गोळ्या औषधं सुरु असतात. अशांमध्ये साइड इफेक्ट होण्याची शक्यता जास्त आहे.

कोरोनाची पहिली लस घेतल्यानंतर दुसऱ्या लसीच्या वेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर लस घ्यावी का?

पहिल्या डोसनंतर कोरोना पॉझिटिव्ह झालात, तर आधी उपचार करा. अशा परिस्थितीत तीन महिन्यापर्यंत डोस नाही घेतला तरी चालेल. कोरोनाची लस अँटिबॉडीज तयार होण्यासाठी दिली जाते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही अँटिबॉडीज तयार होतात, त्यामुळे तीन महिन्यानंतरही दुसरा डोस घेऊ शकता.